दौंड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीसाठी ७४.७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:43+5:302021-01-16T04:15:43+5:30

दौंड : दौंड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीसाठी ७४.७० टक्के मतदान शांततेत झाले असल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील, नायब तहसीलदार सचिन ...

74.70% polling for 49 gram panchayats in Daund taluka | दौंड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीसाठी ७४.७० टक्के मतदान

दौंड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीसाठी ७४.७० टक्के मतदान

googlenewsNext

दौंड : दौंड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीसाठी ७४.७० टक्के मतदान शांततेत झाले असल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील, नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी दिली. दरम्यान सोमवार (दि.१८) रोजी नगर मोरी येथील शासकीय गोडाऊनमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही ठिकाणी राजकीय पार्श्वभूमीवर गटा तटाच्या राजकारणामुळे किरकोळ बाचाबाची झाली. मात्र याची पोलीस स्टेशनला कुठेही नोंद नाही.

परिणामी लोकसभा, विधानसभा या दोन्ही निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपातळीवर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मतदारात उत्साहाचे वातावरण होते तर काही ठिकाणी दिवसभर मतदान केंद्रावर रांगा लागून होत्या. काही ठिकाणी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. परंतु तुरळक गर्दी असलेल्या मतदान केंद्रावर दिवसभरात मतदानाच्या कालावधीत टप्या टप्याने चांगले मतदान झाल्याची वस्तुस्थिती होती.

सकाळी सुरुवातीला मतदारांचा ओघ कमी होता. मात्र हा ओघ पुढे वाढत गेला. उमेदवार समर्थक कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्राच्या परिसरात आणण्यासाठीची लगबग सुरु होती.

खडकी, रावणगाव, पाटस, यवत, कुसेगाव, कानगाव, वरवंड, पिंपळगाव, नानगाव, बोरीपार्धी, वाळकी, शिरापूर, लिंगाळी, गोपाळवाडी, सोनवडी, कुसेगाव, राजेगाव, बोरीबेल, खोर या ग्रामपंचायतीसाठी चुरशीच्या लढती झाल्या.

सोनवडीला मतदानात व्यत्यय

सोनवडी (ता. दौंड) येथील प्रभाग क्र. २ (अ) च्या बुथवर मतदान केंद्र अध्यक्ष पब्लिक आॅफिसरच्या जाग्यावर जाऊन बसले. त्यांनी कमी दिसणाऱ्या व्यक्तीच्या मुलाला मतदान न करु देता स्वत: जाऊन मतदान केले. त्यामुळे या अधिकाºयाविरोधात तक्रार आली होती. एकंदरीत तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाºयाचे जबाब घेतलेले आहेत. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी सांगितले. दरम्यान या घटनेनंतर काही काळ मतदान थांबले होते. मात्र ते पुन्हा पूवर्वत करण्यात आले होते.

-----------

खोरला चुरशीची लढत

खोर : खोर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत यावर्षी चुरशीची लढत पहावयास मिळाली. मात्र मतदान शांततेत पार पडले.

श्री काळभैरवनाथ सहकार पँनेल विरूद्ध श्री भैरवनाथ जनसेवा पँनेल समोर समोर उभा असल्याने सर्वात मोठी रंगत वार्ड क्र ४ मध्ये पहावयास मिळाली आहे. मतदान केंद्रावर सकाळ पासून रांगा लागल्या असून कोणाच्या पारडयात मतदार आपला कौल टाकतात याकडे खोर गावाचे लक्ष लागले आहे. रामचंद्र चौधरी विरूद्ध भाऊसाहेब कुदळे यांच्यात जोरदार लढत झाली असून या निवडणूकीत कोणता उमेदवार आपली ताकद दाखवेल हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

१५ दौंड

खोर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत निवडणूकीत यावर्षी चुरशीची लढत पहावयास मिळाली.

१५दौंड१

पाटस (ता. दौंड) येथे मतदारांच्या लागलेल्या रांगा.

---------------

Web Title: 74.70% polling for 49 gram panchayats in Daund taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.