आयपीओ घ्यायला सांगून ७५ लाखांना चुना लावला! रहाटणीतील घटना

By नारायण बडगुजर | Published: March 15, 2024 01:15 PM2024-03-15T13:15:00+5:302024-03-15T13:16:30+5:30

रहाटणी येथे ३ डिसेंबर ते १३ मार्च या कालावधीत ही घटना घडली....

75 lakhs were limed by asking to take IPO! Incidents in Rahatni | आयपीओ घ्यायला सांगून ७५ लाखांना चुना लावला! रहाटणीतील घटना

आयपीओ घ्यायला सांगून ७५ लाखांना चुना लावला! रहाटणीतील घटना

पिंपरी : शेअर मार्केटबाबत गुंतवणूक करण्यास सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर एका कंपनीचा आयपीओ घेण्यास सांगून एकाची ७५ लाख रुपयांची फसवणूक केली. रहाटणी येथे ३ डिसेंबर ते १३ मार्च या कालावधीत ही घटना घडली.

मनोज आत्मप्रकाश भाटीया (४६, रा. रहाटणी) यांनी या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आदित्य पाटील आणि संशयित महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज शेअर मार्केट ट्रेडिंगच्या शोधात होते. त्यावेळी इन्स्टाग्रामच्या पेजवरून त्यांना संशयितांनी व्हाॅट्सॲपच्या एका ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. त्यांना एका कंपनीच्या आयपीओबाबत माहिती देऊन ७५ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले. त्यानंतर सात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवून उर्वरित रकमेची फसवणूक केली.

Web Title: 75 lakhs were limed by asking to take IPO! Incidents in Rahatni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.