जिल्ह्यात ७५ हजार ७७१ कोरोना योद्ध्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:08 AM2021-05-17T04:08:43+5:302021-05-17T04:08:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना लसीकरणात राज्यात आघाडीवर असलेल्या पुणे जिल्ह्यात अद्यापही तब्बल ७५ हजार ७७१ आरोग्य कर्मचारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना लसीकरणात राज्यात आघाडीवर असलेल्या पुणे जिल्ह्यात अद्यापही तब्बल ७५ हजार ७७१ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. तर ज्येष्ठ नागरिकांची ही संख्या खूपच मोठी म्हणजे तब्बल ६ लाख १५ हजार ८१३ एवढी आहे. यामुळे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांचे दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल.
शासनाने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी १ मे पासून सुरू झालेले १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे कोरोना लसीकरण थांबविले. जिल्ह्यात ४७ हजार ६३५ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस दिला. तर दुसरा डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ २४ हजार ६३ एवढी आहे.
फ्रंटलाईन वर्कर्समध्ये ८७ हजार २०० जणांनी पहिला तर ३६ हजारांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील १३ लाख ९७ हजार २५० ज्येष्ठ नागरिकांपैकी ७ लाख ४५ हजार २४२ जणांचा पहिला डोस झाला आहे. १ लाख २९ हजार ४३० जणांनी केवळ दुसरा डोस घेतला. यामुळेच अद्याप तब्बल ७ लाख लोकांना दुसरा डोस देणे बाकी आहे. पुढील एका महिन्यात पूर्ण होईल किंवा नाही माहिती नाही. यामुळे १८ ते ४४ वर्षांवरील लोकांना पहिला डोस मिळण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागणार माहीत नाही.
-------
आरोग्य कर्मचारी : ४६९८७
- पहिला डोस : ४८६३५
- दुसरा डोस : २४०६३
--------
फ्रंटलाइन वर्कर्स : ७३१२५
पहिला डोस : ८७२००
दुसरा डोस : ३६००१
-------
४५ वर्षांवरील : १३९७२५०
पहिला डोस : ७४५२४२
दुसरा डोस : १२९४३०
------
जिल्ह्यात असे झाले लसीकरण
- एकूण पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण : १००९३७६
- पहिला डोस घेतलेले नागरिक : ८७२१४४
- दुसरा डोस घेतलेले नागरिक : १३७२२९