वारुळवाडी ग्रामपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:38+5:302021-01-16T04:15:38+5:30

निवडणूक निर्णय अधिकारी के. बी. मोरे यांनी दिली. दरम्यान , मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली. उपविभागीय ...

75% turnout for Warulwadi Gram Panchayat | वारुळवाडी ग्रामपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान

वारुळवाडी ग्रामपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान

Next

निवडणूक निर्णय अधिकारी के. बी. मोरे यांनी दिली.

दरम्यान , मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणुक गणपीरबाबा ग्रामविकास पॅनल व भागेश्वर ग्रामविकास पॅनेल यामध्ये चुरशीची लढत झाली . एकूण सहा प्रभागांमधील सतरा जागांपैकी एक जागा बिनविरोध होऊन १६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ३३ उमेदवार रिंगणात होते . मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी दोन्ही पॅनलच्या प्रमुखांसह उमेदवारांनी गाड्यांची विशेष सोय केली होती.

वारूळवाडी ग्रामपंचायत प्रभाग निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे : प्रभाग क्रमांक १ - ७९८ ( ६८.६७ टक्के), प्रभाग क्रमांक २ - ८३४ (७७.२२ टक्के), प्रभाग क्रमांक ३ - ६२७ ( ७३.८५ टक्के), प्रभाग क्रमांक ४ - ९६४ ( ७८.११ टक्के ), प्रभाग क्रमांक ५ - १००८ ( ८३.४४ टक्के), प्रभाग क्रमांक ६- ११७५ (७०.७४ टक्के), एकूण झालेले मतदान सरासरी मतदान ५४१२ (७५.१४ टक्के).

१५ नारायणगाव

वारुळवाडी मतदान केंद्रावर मतदारांची झालेली गर्दी .

Web Title: 75% turnout for Warulwadi Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.