यवत ग्रामपंचायतीसाठी ७५.७६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:56+5:302021-01-16T04:14:56+5:30
सकाळी सात वाजल्यासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १४,००६ ...
सकाळी सात वाजल्यासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
एकूण १४,००६ पैकी १०,६१२ मतदारांनी (७५.७६%) मतदानाचा हक्क बजावला. वार्ड क्रमांक १ मध्ये सर्वाधिक मतदान झाले. एकूण २०७४ पैकी १६७८ मतदारांनी (८०.९०%) मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक २ मध्ये २९७३ पैकी २१४० मतदारांनी (७१.९८%) मतदान केले.
वार्ड क्रमांक ३ मध्ये १८२३ पैकी १३७५ मतदारांनी (७५.४२%) मतदान केले. वार्ड क्रमांक ४ मध्ये २०४७ पैकी १५७५ मतदारांनी (७६.९४%) मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक ५ मध्ये २४६० पैकी १८०३ मतदारांनी (७३.३२%) मतदारांनी मतदान केले. वार्ड क्रमांक ६ मध्ये २६३१ पैकी २०४१ मतदारांनी (७७.५७%) मतदारांनी मतदान केले.
वार्ड क्रमांक १ व ६ मध्ये मतांचा टक्का वाढलेला दिसला. सर्वच १७ जागांसाठी चुरशीने मतदान झालेले असल्याने आता सोमवार (दि.१८) रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- यवत पोलीस स्टेशन हद्दीतील २८ गावांमध्ये शांततेत मतदान...
यवत पोलीस स्टेशन हद्दीत एकूण २८ गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. २८ पैकी यवत , पाटस, वरवंड, बोरीपारधी या चार मोठ्या लोकसंख्येची गावे समाविष्ट होती. २८ गावांमध्ये १४४ बूथमध्ये मतदारांनी मतदान केले. कुसेगाव येथील किरकोळ बाचाबाची वगळता सर्वत्र कसलाही वाद न होता मतदान प्रक्रिया पार पडली असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १० पोलीस अधिकारी व सुमारे २०० पोलीस कर्मचारी बंदोबस्त साठी तैनात होते.
यवत येथे मतदान केंद्रावर वृद्ध महिलेला मतदानासाठी उचलून घेऊन जाताना कार्यकर्ते.