स्वारगेट ते कात्रज मेट्रो डीपीआरसाठी ७६ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:59 AM2018-05-11T03:59:44+5:302018-05-11T03:59:44+5:30
स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. यासाठी महामेट्रोला ७६ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
पुणे - स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. यासाठी महामेट्रोला ७६ लाख २८ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
मेट्रो प्रकल्पांतर्गत स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा मेट्रोमार्ग कात्रजपर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेत महापालिकेने या मार्गाचा डीपीआर करण्याचे काम करण्यास सांगितले. त्यासाठीचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. महामेट्रोने पालिकेकडे ७६ लाख २८ हजार रुपयांची मागणी केली आहे, त्यानुसार ही रक्कम आणि त्यावर १२ टक्के जीएसटी, अशी रक्कम दिला जाणार आहे.