विभागातील सीबीएसईचे ७६ हजार विद्यार्थी परीक्षेविना पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:06+5:302021-04-16T04:11:06+5:30

सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या लेखी ...

76,000 CBSE students in the department pass without examination | विभागातील सीबीएसईचे ७६ हजार विद्यार्थी परीक्षेविना पास

विभागातील सीबीएसईचे ७६ हजार विद्यार्थी परीक्षेविना पास

Next

सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, राज्य शासनानेसुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द कराव्यात,‌ अशी भूमिका घेणारा पालकांचा एक गट आहे. दहावीची‌ म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवासाचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे परीक्षा न दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे योग्य नाही, असे मानणारा पालकांचा दुसरा गट आहे. मागील वर्षी सीबीएसईच्या ७६ हजार विद्यार्थ्यांनी पुणे विभागातून नोंदणी केली होती. या वर्षीसुद्धा ७६ हजारांच्या आसपास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्य शासनाने सीबीएसई‌प्रमाणे निर्णय घेऊ नये, असे स्पष्ट मत राज्यातील शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुध्दा याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल,असे सांगितले आहे. त्यामुळे‌ दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत विचार न करता अभ्यास सुरू ठेवावा, असे राज्य मंडळाच्या ‌अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे.

-------------

दहावीची २०२० मध्ये परीक्षा दिलेल्या पुणे विभागातील सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी

नोंदणीकृत विद्यार्थी - ७६,०८०

मुले -४४,४१८

मुली- ४०,९६४

प्रविष्ट झालेले विद्यार्थी -७५,९७०

मुले -४४,३५५

मुली- ३१,६१५

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी -७४,४८५

मुले -४३,२९७

मुली- ३१,१८८

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची टक्केवारी - ९८.०५

मुले - ९७.६१

मुली -९८.६५

--------------

दहावीची परीक्षा घेणे आवश्यक असले तरी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सीबीएसई प्रमाणे राज्य शासनाने एस एस सी बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात. - मिलिंद शिंदे, पालक

--------------------

दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच शासनाने परीक्षा घ्यावी.परीक्षा‌ रद्द करण्याची घाई करू नये.विद्यार्थांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करणे योग्य नाही.

- शैलेश जौंजाळ, पालक

Web Title: 76,000 CBSE students in the department pass without examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.