कुकडी प्रकल्पांतर्गत धरणांमध्ये ७७ टक्के पाणी साठा; वडज धरण १०० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 11:56 AM2023-09-09T11:56:03+5:302023-09-09T11:56:23+5:30

वडज, येडगाव, माणिकडोह , पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी आणि डिंभा या धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे...

77 percent water storage in dams under Kukdi project; Vadaj dam is 100 percent full | कुकडी प्रकल्पांतर्गत धरणांमध्ये ७७ टक्के पाणी साठा; वडज धरण १०० टक्के भरले

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणांमध्ये ७७ टक्के पाणी साठा; वडज धरण १०० टक्के भरले

googlenewsNext

नारायणगाव (पुणे) : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांपैकी वडज धरण १०० टक्के, तर डिंभे धरण ९६ टक्के भरल्याने या धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या धरणांमध्ये आजमितीला २२.९१ टीएमसी (७७.२० टक्के) पाणी साठा झाला आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकरी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने वडज, येडगाव, माणिकडोह , पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी आणि डिंभा या धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. या धरणांपैकी आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण ९५.५८ टक्के भरले आहे. या धरणातून डिंभे डाव्या आणि उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. डिंभे सांडवा विसर्ग २८०० क्युसेक वेगाने सुरू केला. तसेच जुन्नर तालुक्यातील वडज धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून पूर नियंत्रणासाठी शुक्रवारी ( दि. ८) सकाळी १०:३० वाजता मीना नदीद्वारे २२०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी २ वाजता विसर्ग वाढवून तो ५१८७ वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विसर्ग वाढविल्याने मीना नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी, डिंभा, विसापूर, घोड या सर्व धरणांमध्ये आजअखेर २२.९२ टीएमसी ( ७७.२० टक्के ) उपयुक्त पाणी साठा झाला आहे. गतवर्षी आजमितीला २६.३९ टीएमसी ( ८८.९२ टक्के ) उपयुक्त पाणी साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३.४८ टीएमसी (११.७२ टक्के) पाणीसाठा कमी आहे.

जुन्नर तालुक्यातील पाच धरणांचा उपयुक्त पाणी साठा व टक्केवारी तसेच झालेल्या पावसाचे प्रमाण-

येडगाव धरणात एकूण पाणीसाठा ३९९ दलघ फूट ( २०.५३ टक्के) पाणी साठा उपलब्ध झाला आहे. पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आजअखेर १८८ मिमी पाऊस झाला असून, २४ तासांत ४ मिमी पाऊस झाला आहे.

वडज धरणात एकूण पाणीसाठा ११७३ दलघ फूट ( १०० टक्के) पाणी साठा झाला असून, हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ३४१ मिमी पाऊस झाला असून, २४ तासांत २७ मिमी पाऊस झाला आहे.

माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण पाणी साठा ६६२६ दलघ फूट ( ६५.११ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी आजअखेर ७८९५ दलघ फूट ( ७७.५८ टक्के ) पाणी साठा झाला होता . पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ५२० मिमी पाऊस झाला असून, २४ तासांत २१ मिमी पाऊस झाला आहे.

पिंपळगाव जोगा धरणाच्या क्षेत्रामध्ये २७६९ दलघ फूट ( ७१.१७ टक्के) पाणी साठा उपलब्ध झाला असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ०१ जूनपासून आजअखेर ५११ मिमी पाऊस झाला आहे. २४ तासांत ९ मिमी पाऊस झाला आहे .

आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणात ११९४२ दलघ फूट ( ९५.५८ टक्के) पाणी साठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ५३९ मिमी पाऊस झाला आहे. २४ तासांत ५५ मिमी पाऊस झाला आहे.

चिल्हेवाडी धरणाच्या क्षेत्रामध्ये ४८० दलघ फूट ( ५९.८५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ०१ जूनपासून आजअखेर ४५८ मिमी पाऊस झाला आहे. २४ तासांत ५ मिमी पाऊस झाला आहे.

घोड धरणाच्या क्षेत्रामध्ये ९२२ दलघ फूट ( १८.९३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ०१ जूनपासून आजअखेर २३४ मिमी पाऊस झाला आहे.

Web Title: 77 percent water storage in dams under Kukdi project; Vadaj dam is 100 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.