भोर तालुक्यातील खरीप हंगामासाठी ७९ कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:54+5:302021-06-16T04:14:54+5:30

कर्जवाटप पूर्ण होणार असल्याचे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी सांगितले. भोर तालुक्यात एकूण १९६ गावे असून खरीप पिकाखालील ...

79 crore crop loan target for kharif season in Bhor taluka | भोर तालुक्यातील खरीप हंगामासाठी ७९ कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट

भोर तालुक्यातील खरीप हंगामासाठी ७९ कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट

Next

कर्जवाटप पूर्ण होणार असल्याचे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.

भोर तालुक्यात एकूण १९६ गावे असून खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर, तर खरीप गावे १५५ आहेत. तालुक्यात ७५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या असून ९८४२ सभासद आहेत. त्यांना खरिपातील भात, कांदा, ऊस, टोमॅटो या पिकांसाठी सुमारे ७९.४३ कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटपाची मुदत आहे. आत्तापर्यंत ६६ कोटी म्हणजे ८४% टक्के कर्ज वाटप झाले असून पुढील तीन महिन्यांत राहिलेले कर्जवाटप पूर्ण करून १००% कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.तालुक्यात शेतकऱ्यांना पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुमारे ८० ते ९०% कर्जवाटप केले जाते खासगी किंवा शासकीय बँकांकडून १० ते १५% कर्जवाटप केले जाते त्यासाठी अनेक कागदपत्रांसाठी त्रास दिला जातो हेलपाटे मारायला लागत असल्याचे शेतकरी सांगतात.

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतर्गत ५१ कोटी एक लाखाची कर्जमाफी मिळाली आहे

भोर तालुक्यात ८३५८ खातेदारांपैकी ८३१९ खातेदारांना महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंर्तगत ५१ कोटी एक लाख रुपयांची कर्जमाफी ३१/७/२०१९ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळाले आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी सभासदांना अद्याप प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा झालेली आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

दरम्यान, डाॅ. पंजाबराव देशमुख व्याजसवलत योजनेंर्तगत ३ कोटी ४४ लाख रु. प्रस्ताव पाठवलेले आहेत. मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नसून जुलै महिन्यात सदर योजनेला निधी मिळेल आणि शेतकऱ्यांना पैसे मिळतील, असे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.

Web Title: 79 crore crop loan target for kharif season in Bhor taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.