जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत लोहरस अंगावर पडून ८ जण जखम; चौघांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 06:10 PM2022-11-15T18:10:22+5:302022-11-15T18:10:35+5:30

कंपनीत बॉयलर मध्ये १६५० ते १८०० डिग्री सेल्सिअसला लोखंड वितळवून लोहरस बनवला जातो

8 injured in ISMT company in Jejuri after iron falls on body The condition of four is critical | जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत लोहरस अंगावर पडून ८ जण जखम; चौघांची प्रकृती गंभीर

जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत लोहरस अंगावर पडून ८ जण जखम; चौघांची प्रकृती गंभीर

googlenewsNext

जेजुरी : जेजुरी नजीक असणाऱ्या आय एस एम टी कंपनीत काल सकाळी सहाच्या दरम्यान लोखंडाचा रस वाहून नेणाऱ्या लॅडलची साखळी ( वायर रोप ) तुटल्याने वितळलेला लोहरस अंगावर पडून ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मोरगाव रोडवर आय एस एम टी ही कंपनी लोखंडी रॉड, सळई बनवण्याचे काम करते. कंपनीत बॉयलर मध्ये १६५० ते १८०० डिग्री सेल्सिअसला लोखंड वितळवून लोहरस बनवला जातो. याच लोहरसापासून वेगवेगळ्या आकाराचे रॉड व सळई बनवल्या जातात. 

अपघातात क्रेन चालक जितेंद्र सिंग, सुजित विलास बरकडे ( वय २५), चुनेज भानुदास बरकडे ( वय २२), अरूनकुमार सिन्हा ( वय ५२ ) आकाश यादव ( वय २२) दुर्गा यादव ( वय ४०) शिवाजी राठोड ( वय ३८) मनोरंजन दास ( वय ३५) यांच्या अंगावर वितळत्या लोखंडाचा रस पडल्याने जखमी झाले आहेत. यातील चार जण गंभीर जखमी असून, क्रेन चालक जितेंद्र सिंग याला पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतर सात जणांवर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात वरून पडलेल्या लोहरसाने आठ जण जखमी झाले असले तरी सुदैवाने मोठा अनुचित प्रकार झाला नाही.  ही घटना घडली त्यावेळी हाच लोहरस पक्षांच्या वर ही उडाला होता. यात पक्षांची अक्षरशः राख झाली आहे. अंगावर शहारे आणणारी ही अत्यंत गंभीर घटना असल्याची चर्चा आहे. या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क केला असता व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Web Title: 8 injured in ISMT company in Jejuri after iron falls on body The condition of four is critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.