पुण्यातील पीएमपी मालामाल; रोजचे प्रवासी ८ लाख तर उत्पन्न १ कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 12:31 PM2021-12-09T12:31:27+5:302021-12-09T12:45:57+5:30

पीएमपीतून रोज जवळपास ८ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत तर यातून रोजचे उत्पन्न सुमारे १ कोटी ३५ लाख प्राप्त होत आहे.

8 lakh daily commuters and 1 crore household income for pune pmpml | पुण्यातील पीएमपी मालामाल; रोजचे प्रवासी ८ लाख तर उत्पन्न १ कोटींच्या घरात

पुण्यातील पीएमपी मालामाल; रोजचे प्रवासी ८ लाख तर उत्पन्न १ कोटींच्या घरात

Next

पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या पीएमपी आता सुसाट निघाली आहे. पीएमपीच्या प्रवाशांच्या संख्येत व उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. पीएमपीतून रोज जवळपास ८ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत तर यातून रोजचे उत्पन्न सुमारे १ कोटी ३५ लाख प्राप्त होत आहे.

लॉकडाऊन पूर्वी पीएमपीतून रोज साधारणपणे दहा ते साडेदहा लाख प्रवासी प्रवास करीत. लॉकडाऊननंतर मात्र सप्टेंबर २०२० पासून पीएमपीएमएलची बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू झाली. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पीएमपीने पुन्हा प्रवाशांच्या सेवेत असलेल्या रातराणी, पुणे दर्शन व महिलांसाठी खास तेजस्विनी बससेवा पूर्ववत केल्या. सध्या महाविद्यालये सुरू झाली असली तरी शाळा अजूनही बंदच आहेत. असे असतानाही पीएमपीएमएलने दैनंदिन प्रवासी संख्येचा ८ लाखांचा तर दैनंदिन उत्पन्नाच्या बाबतीत १ कोटी ३५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या पीएमपीएमएलच्या दररोज सुमारे १५०० बसेस धावत आहेत.

''पीएमपी आता पूर्वपदावर येत आहे. अजूनही शाळा सुरू झाल्याने प्रवासी संख्या पूर्वीच्या तुलनेने कमी आहे. मात्र ती गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे  पुणे पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले.'' 


दिनाक - प्रवासी संख्या - एकूण उत्पन्न - बस संख्या

२२ नोव्हेंबर २१ - '७ लाख ८८ हजार १११' - '१ कोटी ३८ लाख ६४ हजार ९००' - '१, ४७५'

६ डिसेंबर २१ - '८ लाख १२ हजार ८२३' - '१कोटी ३६ लाख ७९ हजार ०९८' - '१, ४९७'

७ डिसेंबर २१ - '८ लाख ३हजार २४७' - '१ कोटी ३५ लाख ३२ हजार ८१३' - '१, ४६८'

Web Title: 8 lakh daily commuters and 1 crore household income for pune pmpml

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.