पुण्यात विक्रीसाठी आणलेला तब्बल ८ लाखांचा गांजा जप्त; सूत्रधार महिलेसह पंटर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 09:24 PM2021-07-17T21:24:34+5:302021-07-17T21:25:13+5:30

सातववाडी हडपसर बस थांब्यासमोर एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती...

8 lakh ganja seized in Pune; women and one person arrested | पुण्यात विक्रीसाठी आणलेला तब्बल ८ लाखांचा गांजा जप्त; सूत्रधार महिलेसह पंटर गजाआड

पुण्यात विक्रीसाठी आणलेला तब्बल ८ लाखांचा गांजा जप्त; सूत्रधार महिलेसह पंटर गजाआड

googlenewsNext

पुणे : पुणे - सासवड रस्त्यावर गांजा विक्रीसाठी मोटारीतून आलेल्या तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४० किलो गांजा जप्त केला आहे. त्याचबरोबर त्याला विक्रीसाठी हा गांजा देणारी मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे.

सचिन नरसिंग शिंदे (वय ३३, रा. रामलिंग रोड, ता. शिरुर) आणि भाग्यश्री बाबुराव घुगे (वय ४०, रा. शिरुर) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८ लाख १० हजारांचा गांजा, मोटार व मोबाईल असा १३ लाख २९ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे एक पथक गस्तीवर असताना, हवालदार मनोज साळुके यांना माहिती मिळाली होती की, सातववाडी हडपसर बस थांब्यासमोरील सार्वजनिक रोडवर एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार प्रविण शिर्के, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी यांच्या पथकाने सापळा रचून सचिन शिंदे याला गाडीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून गाडीची झडती घेतली असता, ४० किलो गांजा मिळाला. त्याने तो गांजा त्याची शिरुर येथील मालकीण भाग्यश्री घुगे हिच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी एक पथक घुगे हिच्या घराकडे रवाना करून तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

भाग्यश्री हिचा पतीदेखील गांजाची तस्करी करीत असून, तो सध्या हैद्राबाद येथील गुन्ह्यात कारागृहात असल्याचे पोलिसांनी सांगितले. गाजांची तस्करी करतानाच तेथील स्थानिक पोलिसांनी त्याच्यावर ८ महिन्यापूर्वी कारवाई केली आहे. तर सचिन शिंदे याच्यावर देखील जेजुरी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

Web Title: 8 lakh ganja seized in Pune; women and one person arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.