सिंहगडावरुन 150 फूट दरीत पडूनही वाचली 8 महिन्याची गर्भवती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 02:19 PM2017-08-07T14:19:29+5:302017-08-07T14:19:40+5:30
सिंहगडावर तानाजी कडा येथे सेल्फी काढताना गरोदर महिला पाय घसरून 150 फूट दरीत पडली.
पुणे, दि. 7 : सिंहगडावर तानाजी कडा येथे सेल्फी काढताना गरोदर महिला पाय घसरून 150 फूट दरीत पडली. तिला स्थानिक नागरिकांनी वाचवले आणि बाहेर काढले. सुदैवाने तिला की किरकोळ जखमा झाल्या असून उपचारासाठी तिला ग्रामस्थांनी नवले रुग्णालयात दाखल केले आहे. प्रणिती लहू इंगळे (वय २३) असे या तरूणीचे नाव आहे. ती लातूर येथील रहिवासी आहे.
सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे आठ दिवस गडावरील वाहतूक बंद केली आहे. अनेक पर्यटक गडावर पायीच जात असतात. प्रणिती आपल्या पती व भावासह गडावर फिरण्यासाठी आले होते. सेल्फी काढण्यासाठी म्हणून प्रणिती कड्याच्या एकदम टोकावर गेली व तिथेच तिचा तोल गेला. अमोल पेडले यांनी तिला अन्य ग्रामस्थांच्या सहका-याने वर काढले व तत्काळ रुग्णालयात नेले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणिती आठ महिन्याची गरोधर आहे. गडावर फरत असताना तानाजी कडा येथे ते उभे होते. कड्या जवळ सुरक्षा म्हणून लोखडी रेलिंग लावले आहेत. तरी देखील ती रेलिंगच्या बाहेर जाऊन फोटो काढत होती. गडावर पावसाच्या सरी सुरू असल्याने तेथील भाग निसरडा झाला होता. ती पाय घसरून खाली पडली. तसा तिचा पती व भाव मदतीसाठी ओरडु लागले. त्यावेळी दोन पर्यटक अजिंक्य व सिद्धार्थ शिंदे यांनी त्यांना धीर दिला.
ही माहिती गडावरील स्थानिक रहिवाशी यांना मिळाली तशी ग्रामपंचायत सदस्य अमोल पढेर, दत्ता चव्हाण, विकास जोरकर, ही धावून गेले. त्यांनी श्रीअमृतेश्वर मेंटच्या अरुंद पायवाटने खाली उतरले. पडलेल्या महिलेच्या आवाजाच्या दिशेने जण्यासाठी त्यांना तीव्र कडावर आडवे जावे लागले. त्यांनी तिला उचलून, धरून वर आणले. वर आल्यावर पती व भावाने तिला मिठी मारून भावना व्यक्त केल्या.