पुणेकरांसाठी एसटीच्या ताफ्यात ८ नवीन ई-शिवाई दाखल; 'या' शहरांसाठी धावणार

By नितीश गोवंडे | Published: April 24, 2023 04:22 PM2023-04-24T16:22:15+5:302023-04-24T16:22:24+5:30

नवीन ई-शिवाई बसला पहिल्या शिवाई बस पेक्षा पूर्णपणे नवा लूक देण्यात आला

8 new e-Shivai added to ST fleet for Pune residents; Will run for 'these' cities | पुणेकरांसाठी एसटीच्या ताफ्यात ८ नवीन ई-शिवाई दाखल; 'या' शहरांसाठी धावणार

पुणेकरांसाठी एसटीच्या ताफ्यात ८ नवीन ई-शिवाई दाखल; 'या' शहरांसाठी धावणार

googlenewsNext

पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ ई-शिवाई बस दाखल झाल्या आहेत. आरटीओ कार्यालयातील बस पासिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या ई-शिवाई प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. या सर्व बस पुणे विभागातून मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक या शहरांसाठी धावणार आहेत.

एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १ जून २०२२ रोजी एसटीच्या ताफ्यात पहिली ई-शिवाई बस दाखल झाली होती. त्यानंतर आता एसटीच्या ताफ्यात ई-शिवाई बस दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. नवीन ई-शिवाई बसला पहिल्या शिवाई बस पेक्षा पूर्णपणे नवा लूक देण्यात आला आहे. एसटीच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात १५० ई-शिवाई बस दाखल होणार आहेत. यापैकी एकट्या पुणे विभागाला ५० ई-बस मिळणार आहेत. या सर्व बस २० मे पर्यंत टप्याटप्याने एसटीच्या पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल होतील, असा अंदाज एसटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पुण्यातून प्रामुख्याने पुणे-मुंबई, पुणे-छत्रपती संभाजीनगर, पुणे-ठाणे, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-बोरिवली या मार्गांवर या ई-शिवाई धावणार आहेत. त्यासाठी स्वारगेट येथील एसटीच्या विभगीय कार्यालयात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आता ई-शिवनेरीची उत्सुकता..

एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवाई बरोबरच ई-शिवनेरी बस देखील दाखल होणार आहेत. मुंबई आरटीओमध्ये पासिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर या बस महाराष्ट्र दिनी (१ मे) प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्‍यता आहे. या बस पुणे-मुंबई मार्गावर धावणार आहे. ई शिवनेरी बस वातानुकूलित असल्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.

Web Title: 8 new e-Shivai added to ST fleet for Pune residents; Will run for 'these' cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.