जिल्ह्यात ४९ प्रस्तावित ऑक्सिजन प्लांटपैकी ८ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:41+5:302021-05-25T04:12:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन निर्मितीसाठी ...

8 out of 49 proposed oxygen plants started in the district | जिल्ह्यात ४९ प्रस्तावित ऑक्सिजन प्लांटपैकी ८ सुरू

जिल्ह्यात ४९ प्रस्तावित ऑक्सिजन प्लांटपैकी ८ सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात ४९ ऑक्सिजन प्लांट प्रस्तावित केले असून, यापैकी ८ प्लांटचे काम पूर्ण देखील झाले आहे. यामुळे सध्या ३० हजार ९३ एलपीएमने ऑक्सिजन क्षमता वाढली आहे.

जिल्ह्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढली, तसी ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होत गेली. जिल्ह्यात कोरोना पिकवर असताना दिवसाला तब्बल ३१० मे.टन ऑक्सिजन पुरवठा लागत होता. परंतु पुण्यासोबतच संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनची मागणी वाढल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला. शासनाने औद्योगिक वापराचा ऑक्सिजन पूर्णपणे बंद करत राज्यात तयार होणारा ऑक्सिजन शंभर टक्के ऑक्सिजन वापर आरोग्यासाठी राखीव ठेवला. त्यानंतर देखील ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन मागविण्यात आला. परंतु हीच परिस्थिती कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर कायम राहिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळेच प्रशासनाने तातडीने जिल्ह्यात ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी हाॅस्पिटलनिहाय प्लांट प्रस्तावित केले. जिल्ह्यात ४९ ऑक्सिजन प्लांट प्रस्तावित केले. यात पुणे महापालिका हद्दीत १२ प्लांट पैकी ४ सुरू झाले, पिंपरी-चिंचवड शहरात प्रस्तावित ७ प्लॅन्ट पैकी २ प्लॅन्ट सुरू झाले आणि ग्रामीण भागात २९ पैकी ८ प्लॅन्ट सुरू झाले आहेत. ससूनमध्ये एक प्लॅन्ट वाढविण्यात येणार असून, क्षमता दुपट्टीने वाढविण्यात येणार आहे. तर सध्या ४१ ऑक्सिजन प्लॅन्टचे काम प्रगतिपथावर आहे.

Web Title: 8 out of 49 proposed oxygen plants started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.