TET Exam: टीईटी परीक्षेस ८ हजार विद्यार्थी 'डुप्लिकेट'! परीक्षेस तब्बल ९० टक्के उमेदवारांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 01:24 PM2021-11-22T13:24:28+5:302021-11-22T13:55:14+5:30

परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा २०१३ पासून घेतली जात असून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सातवी टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे मागील वर्षी टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे...

8 thousand duplicates for tet exam 90 percent student attended exam | TET Exam: टीईटी परीक्षेस ८ हजार विद्यार्थी 'डुप्लिकेट'! परीक्षेस तब्बल ९० टक्के उमेदवारांची उपस्थिती

TET Exam: टीईटी परीक्षेस ८ हजार विद्यार्थी 'डुप्लिकेट'! परीक्षेस तब्बल ९० टक्के उमेदवारांची उपस्थिती

Next

पुणे: TET Exam: रविवारी घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) काही अपवाद वगळता सुरळीतपणे पार पडली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्याथ्र्यांपैकी तब्बल ८८ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. त्यामुळे एसटी संपाचा परीक्षेवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यातच ८ हजार डुप्लिकेट विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे समोर आले. परीक्षेच्या पहिल्या सत्रात कोल्हापूर, नाशिक औरंगाबाद व धुळे जिल्ह्यांत काही ठिकाणी परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा २०१३ पासून घेतली जात असून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सातवी टीईटी परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे मागील वर्षी टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यापूर्वी १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेस ३ लाख ४३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले, राज्यातील १ हजार ४४३ परीक्षा केंद्रांवर पेपर क्रमांक १ साठी राज्यातील २ लाख ५४ हजार ४२८ विद्यार्थ्यांच्या तर पेपर क्रमांक २ साठी २ लाख १४ हजार २५० विद्यार्थ्यांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.

टीईटी परीक्षेचा निकाल दीड महिन्यात जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा येत्या फेब्रुवारीअखेरीस घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तत्पूर्वी, टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, असे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

'डुप्लिकेट विद्यार्थी कोणते?

टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांनी दोन ते तीन वेळा ऑनलाईन अर्ज भरला होता, अशा विद्यार्थ्यांचा केवळ एकच अर्ज गृहित धरण्यात आला. एकापेक्षा जास्त वेळा अर्ज भरणाऱ्या या 'डुप्लिकेट' विद्यार्थ्यांची संख्या तब्बल आठ हजार होती. त्यामुळे या प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क साधून त्यांचा केवळ एकच अर्ज ग्राह्य धरण्यात आला.

 

Web Title: 8 thousand duplicates for tet exam 90 percent student attended exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.