भोर तालुक्यातील खासगी दवाखान्यात ८० टक्के बेड राखीव ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:58+5:302021-04-06T04:09:58+5:30
उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोविडबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या नियोजनाबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत माहिती प्रांतअधिकारी जाधव यांनी दिली. यावेळी तहसीलदार अजित ...
उपविभागीय अधिकारी कार्यालयात कोविडबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या नियोजनाबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत
माहिती प्रांतअधिकारी जाधव यांनी दिली. यावेळी तहसीलदार अजित पाटील उपस्थित होते.
भोर तालुक्यात १७२ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण असून ही संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून घरोघरी जाऊन व्यापारी,दुकानदार,पुढारी व शिक्षक शहरात ७००, तर ग्रामीण भागात ४९०० असे ५६०० लोकांची टेस्ट करण्यात येत आहे.ग्रामीण भागात रजिस्टेशन करायला शिक्षक नेमले असून त्यावर नोडल ऑफिसर म्हणून
गटशिक्षणाधिकारी यांची नेमणूक केली आहे.४५ वर्षावरील ७० ते ८० हजार नागरिक असून आत्तापर्यंत १९ हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.अजून ५० ते ६० हजार लोकांना लस देण्यात येणार असून दररोज सुमारे ३ -------व्हॅकसिनेशन कराव्या लागणार आहेत.
भोर शहरात रामबाग येथे ५० बेडचे कोविड हेल्थ केअर असून आयसीयू व सर्व सुविधा आहेत. नसरापूर येथे सिद्धिविनायक येथे ५० बेडचे कोविड हेल्थ केअर सेंटर आहे. तर नवीन ५० बेडच्या कोविड हेल्थ केअर सेंटरला परवानगी देण्यात आली आहे.रथखाना येथे १०० बेड,आयटीआय येथे ३० बेड असून सौम्य लक्षणे असलेले दाखल केले जातात. तर नवीन ससेवाडी येथे १०० बेड एटी काॅलेज १५० बेडचे कोविड सेटर सुरु करण्यात येणार आहेत. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे तालुक्यातील सुमारे २० खासगी दवाखान्यातील ८० टक्के बेड म्हणजे १६३ बेड उपलब्ध होणार असल्याचे राजेंद्र जाधव यांनी सांगितले. भोर शहरात मंगळवार पेठ व महाडनाका नसरापूर, कामथडी, हातवे येथे पाच पेक्षा अधिक रुग्ण असल्यामुळे या भागात बॅरिकेड्स लावून बंद केला जाणार आहे.या शिवाय शहरात येणाऱ्या सीमा बंद करण्यात येणार आहेत.