८० ग्रामसेवक गेले संपावर
By Admin | Published: November 18, 2016 05:50 AM2016-11-18T05:50:38+5:302016-11-18T05:50:38+5:30
विविध मागण्यांसाठी आंबेगाव तालुक्यातील ८० ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे नागरिकांची
मंचर : विविध मागण्यांसाठी आंबेगाव तालुक्यातील ८० ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे. या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीच्या चाव्या एकत्रित करून त्या गटविकास अधिकारी कार्यालयात आज जमा केल्या.
विविध १५ मागण्यांसाठी ग्रामसेवक बेमुदत संपावर गेले आहेत. आंबेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतीतील ८० ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संपावर गेले असून, त्यांनी आजपासून काम बंद केले आहे. आहुपे, पिंपरगणे, लोणी, तळेघर येथील केवळ ३ कंत्राटी ग्रामसेवक संपावर गेले नसून, त्यांचे कामकाज सुरू आहे. ग्रामसेवकांना दरमहा ३ हजार रुपये प्रवास भत्ता मिळावा, २० ग्रामपंचायतीमागे १ विस्तार अधिकारी नेमावा, कंत्राटी सेवाकाळ पहिल्यापासून धरावा, खोट्या फौजदारी केसेस मागे घेण्यात याव्यात, सोलापूर जिल्ह्यातील २३९ ग्रामविकास अधिकाऱ्यांवर केलेली अन्यायकारक कारवाई मागे घेऊन त्यांना पुन्हा पदावर घ्यावे आदी मागण्यांसाठी संप पुकारला आहे.