स्वखर्चाने बांधला ८० मीटर लांबीचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:49+5:302021-02-25T04:10:49+5:30

स्वच्छ, सुंदर, आदर्श व तंटामुक्त असणारे अशी ओळख असणारे हे गाव. दुर्गम डिंगरी भागातील भाटघर धरणाच्या कुशीतील कमी ...

80 meter long road built at own cost | स्वखर्चाने बांधला ८० मीटर लांबीचा रस्ता

स्वखर्चाने बांधला ८० मीटर लांबीचा रस्ता

Next

स्वच्छ, सुंदर, आदर्श व तंटामुक्त असणारे अशी ओळख असणारे हे गाव. दुर्गम डिंगरी भागातील भाटघर धरणाच्या कुशीतील कमी लोकसंख्या असलेलं बारे हे गाव आहे. कैकाडी वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता कच्चा होता . तेथील वस्तीवरील नागरिकांनी उपसरपंच स्वाती दानवले यांच्याकडे मागणी केली होती. त्यामुळे उपसरपंच स्वाती दानवले व माजी सरपंच सोपान दानवले यांनी रस्ता स्वखर्चाने बांधून दिला. जवळपास हा रस्ता ८० मीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट करून दिला. कैकाडी वस्तीवर जाणारा रस्ता सिमेंटचा झाल्यामुळे तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.

यावेळी शांताराम पवार, गणेश दानवले, कुंडलिक साळेकर, सचिन दामगुडे, रघुनाथ दानवले हे उपस्थित होते.

फोटो - कैकाडी वस्तीकडे जाणारा रस्त्याचे काम पूर्ण झालेले दाखविताना.

छाया - स्वप्निलकुमार पैलवान

Web Title: 80 meter long road built at own cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.