८० ट्रक बटाटावाण पडून, मंचरला लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:15 AM2017-11-24T01:15:14+5:302017-11-24T01:15:27+5:30
मंचर : ढगाळ तसेच पावसाळी वातावरण होऊ लागल्याने रब्बीतील बटाटावाणाची मागणी कमी झाली आहे.
मंचर : ढगाळ तसेच पावसाळी वातावरण होऊ लागल्याने रब्बीतील बटाटावाणाची मागणी कमी झाली आहे. परिणामी, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी ग्राहकांअभावी शुकशुकाट पसरला आहे. मागणीअभावी मंचर बाजार समितीत ८० ट्रक बटाटावाण पडून आहे. यामुळे या वर्षी लगवड क्षेत्रात घट झाली असून, भविष्यात बटाटा उत्पादन कमी होणार आहे.
रब्बी हंगामात या वर्षी खूपच कमी क्षेत्रात बटाटा लागवड झालेली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत जेमतेम ५५० ट्रक बटाटावाणाची विक्री झाली आहे. यापूर्वीची आकडेवारी पाहिली, तर डिसेंबरअखेर सव्वादोन हजार ट्रक बटाटावाण शेतकरी खरेदी करून त्याची लागवड करतो. बटाटावाणाला नीचांकी बाजारभाव आहे. क्विंटलला ५०० ते ७०० रुपये इतका कमी भाव असूनही शेतकरी बटाटा लागवड करण्यास धजावत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मागील दोन वर्षी शेतकºयांना बटाटापिकाने अडचणीत आणले आहे.
एकीकडे ऊसपिकातून चांगला फायदा मिळत असताना बटाटापिकातून भांडवलसुद्धा वसूल होत नाही. उत्पादन कमी निघते; शिवाय बाजारभावसुद्धा कमी मिळतो. बटाट्याच्या बियाण्याचे बाजारभाव मागील वर्र्षी २,००० ते २,५०० रुपयांपर्यंत गेले होते. परिणामी, शेतकºयांना मोठे भांडवल गुंतवावे लागले. हे भांडवल वसूल झाले नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. वातावरणातील बदल व लहरी निसर्गाचा फटका बटाटापिकाला बसतो आहे. त्यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळाला आहे, अशी माहिती व्यापारी संजय मोरे यांनी दिली.
>वातावरणातील बदलाचाही फटका : बाजार समितीत शुकशुकाट
काही शेतकºयांनी धाडस करून बटाटा लागवड केली. अगाद लागवड झालेला बटाटापिकाची संततधार पावसामुळे उगवणच झाली नाही. नोव्हेंबर महिन्यात काही शेतकºयांनी बटाटा लागवड करण्याची तयारी केली होती. मंचर बाजार समितीत राज्यातील शेतकरी बटाटावाणाच्या खरेदीसाठी येऊ लागले होते. मात्र, चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. पावसाळी वातावरण होऊन काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. पावसाच्या शक्यतेने शेतकºयांनी बटाटा लागवड करणे बंद केले आहे. परिणामी, मंचर बाजार समितीत पुन्हा शुकशुकाट पसरला आहे. व्यापाºयांना शेतकºयांची अक्षरश: वाट पाहण्याची वेळ आली आहे.
>३५ ते ४० टक्के क्षेत्रात बटाटा लागवड झाली आहे. लागवड क्षेत्र कमी झाल्याने यापुढे लागवड होऊन उत्पादित होणाºया बटाटापिकाला चांगला बाजारभाव मिळून शेतकºयांना नफा मिळेल, असा अंदाज व्यापारी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. ८० ट्रक बटाटावाण बाजार समितीत पडून आहे. त्याला बाजारभाव कमी आहे.