पत्नीच्या त्रासाला कंटाळून ८० वर्षीय ज्येष्ठाचा घटस्फोटासाठी दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 08:00 PM2019-02-08T20:00:00+5:302019-02-08T20:00:02+5:30

प्रेम करण्यासाठी वयाची अट नाही असे म्हटले जाते. तसेच आता घटस्फोट घेवून विभक्त होण्यासाठीही वयाची अट राहिली नाही...

80-year-old senior to divorce due to wife's Torture | पत्नीच्या त्रासाला कंटाळून ८० वर्षीय ज्येष्ठाचा घटस्फोटासाठी दावा 

पत्नीच्या त्रासाला कंटाळून ८० वर्षीय ज्येष्ठाचा घटस्फोटासाठी दावा 

Next
ठळक मुद्देपती शहरातील एका शिक्षण संस्थेचे संचालक तर पत्नी संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षाघटस्फोटाचे विविध प्रकारचे दावे दररोज कौटुंबिक न्यायालयात दाखल

पुणे : प्रेम करण्यासाठी वयाची अट नाही असे म्हटले जाते. तसेच आता घटस्फोट घेवून विभक्त होण्यासाठीही वयाची अट राहिली नसल्याचे कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यातून पुढे आले आहे. 
    पतीच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांना घराबाहेर काढण्यासाठी विविध मार्गांनी त्रास देणे, जेवण न देणे अशा प्रकारचा छळ पत्नीकडून सुरू आहे. तसेच तिचे गेल्या २० वर्षांपासून एका पुरुषाशी अनैतिक संबंध असा आरोप तक्रारदार पतीने केला आहे. तुकाराम आणि अलका असा या जोडप्याचे नाव आहे. तुकाराम यांचे वय ८० असून अलका या ७५ वयाच्या आहेत. त्यांचे जून १९९६४ साली लग्न झाले होते. तुकाराम हे शहरातील एका शिक्षण संस्थेचे संचालक आहेत तर अलका या संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा आहेत. त्यांना दोन मुली असून त्या विवाहित आहेत. त्यातील एका मुलीची सॉफ्टवेअर कंपनी आहे. तर दुसरी गृहीणी. तुकाराम यांनी संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा, म्हणून त्यांच्यावर पत्नीकडून दबाव टाकण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना हृदयविकार असतानाही वेळेवर जेवण देणे, किचनला कुलूप लावून जाणे असे प्रकार करण्यात येत आहे. अलका यांच्या अनैतिक संबंधाबाबत विचारणा केली असता त्यांनी भांडण करून म्हातारड्या आता कायदा माझ्या बाजूने झाला आहे, हे लक्षात ठेव, अशी धमकी दिली. दरम्यानच्या काळात अलका यांनी गोड बोलून सर्व संपत्ती त्यांच्या नावावर करून घेतल्या, असे दाव्यात नमूद करण्यात आले आहे. 
    तक्रारदार यांना खर्चांसाठी पत्नीकडून दरमहा ५० हजार रुपये देण्यात येत होते. मात्र, तेही अचानकपणे देण्याचे बंद केले. जीवाचा धोका असल्याने अखेर त्यांना घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती त्याचे वकील आणि दी पुणे फॅमिली कॉर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली. 
............................
तर तुझा खून करुन याच घरात गाडीन  
सततच्या वादातून अलका यांनी तुकाराम यांना लाथाबुक्क्यांने व चपलेने मारहाण केली व घरातून हाकलून दिले. त्याबाबत जाब विचारला असता अलका यांनी धमकी दिली की, आता जर तू घरातून निघून गेला नाहीस तर तुला मी माझ्या मित्रांना घेऊन ठार मारेन व तुला ह्याच घरात गाडून टाकीन. राजकारण्यांशी माझे चांगले संबंध आहेत. 
.................
घटस्फोटाचे विविध प्रकारचे दावे दररोज कौटुंबिक न्यायालयात दाखल होत आहे. ज्येष्ठांनी दावे केल्याची संख्या जास्त नसली तरी त्यांचे प्रमाण वाढले आहे. संपत्तीवर डोळा ठेवणे, पतीवर विश्वास नसणे, अनैतिक शंबंध, पती किंवा पत्नीच्या वाागण्यामुळे मुलांवर होणारा परिमाण या कारणामुळे ज्येष्ठ दावे करीत असतात. 

Web Title: 80-year-old senior to divorce due to wife's Torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.