हडपसरमध्ये पकडला ८०३ किलो गांजा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 12:33 AM2019-01-11T00:33:39+5:302019-01-11T00:33:53+5:30
बाबू सिंग (वय ३०, रा़ राजस्थान), शैलेश राव (वय २६, रा़ ओरिसा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ओरिसाहून येणाऱ्या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात
पुणे : ओरिसाहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पकडून सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ७० लाख रुपयांचा ८०३ किलो गांजा जप्त केला असून, दोघांना अटक केली आहे. पुण्यात केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.
बाबू सिंग (वय ३०, रा़ राजस्थान), शैलेश राव (वय २६, रा़ ओरिसा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ओरिसाहून येणाऱ्या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला बुधवारी सकाळी मिळाली होती. त्यानुसार पथकाने हडपसर येथे सापळा लावला़ त्या वेळी कंटेनर थांबवून त्याची झडती घेतल्यावर कंटेनरमध्ये ८०३ किलो गांजा आढळून आला. पथकाने गांजा जप्त करून कंटेनरमधील दोघांना अटक केली आहे. हा गांजा सीमा शुल्क विभागाच्या गोदामात ठेवला आहे. सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख, निरीक्षक मुकेश कुमार, हेड हवालदार सुनील कांबळे, हवालदार संजय पिल्ले, भारत पवार, संजय पिंगळे यांच्या पथकाने केली