RTE Admission: आरटीई अंतर्गत ८१ हजार बालकांचे प्रवेश निश्चित; राज्यात २१ हजार जागा रिक्त

By प्रशांत बिडवे | Published: July 9, 2023 06:05 PM2023-07-09T18:05:30+5:302023-07-09T18:06:17+5:30

पुणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ९३५ खासगी शाळांमध्ये १५ हजार ५९६ जागा रिक्त

81 thousand children admitted under RTE 21 thousand seats are vacant in the state | RTE Admission: आरटीई अंतर्गत ८१ हजार बालकांचे प्रवेश निश्चित; राज्यात २१ हजार जागा रिक्त

RTE Admission: आरटीई अंतर्गत ८१ हजार बालकांचे प्रवेश निश्चित; राज्यात २१ हजार जागा रिक्त

googlenewsNext

पुणे: शिक्षणाचा हक्क कायदा (RTE ) अंतर्गत खाजगी शाळांमध्ये माेफत शिक्षणासाठी प्रवेश दिला जाताे. प्रतिक्षा यादीतील दुसऱ्या फेरीसाठी राज्यातील ८ हजार ८२६ विद्यार्थ्यांची निवड केली हाेती. त्यापैकी ३ हजार २१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यंदा एकुण १ लाख १ हजार ८४६ रीक्त जागांपैकी आतापर्यंत झालेल्या प्रवेश फेऱ्यांमधून ८० हजार ९४५ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. तसेच २० हजार ९०१ जागा रिक्त राहिल्या आहेत.

आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल आणि समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतात. राज्यात यावर्षी ८ हजार ८२३ खाजगी शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४६ जागा रिक्त आहेत. आरटीईअंतर्गत या जागांवर माेफत शिक्षण घेण्यासाठी मुलांना प्रवेश मिळावा यासाठी यंदा ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज प्राप्त झाले हाेते. एप्रिल महिन्यात लाॅटरीच्या माध्यमातून नियमित प्रवेश फेरीसाठी ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड केली हाेती. वेळाेवेळी मुदतवाढ देउनही केवळ ६४ हजार ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले हाेते. त्यानंतर प्रतिक्षा यादीच्या पहिल्या फेरीत प्रवेशासाठी निवड केलेल्या २५ हजार ८९८ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ६९० प्रवेश निश्चित झाले. प्रतिक्षा यादीतील दुसऱ्या फेरीमध्ये ८ हजार ८२७ जणांची निवड हाेती ७ जुलै पर्यंत दिलेल्या मुदतीत ३ हजार २१५ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित केला.

पुणे जिल्ह्यांत १३ हजार ७७२ जागांवर प्रवेश

पुणे जिल्ह्यांत आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ९३५ खासगी शाळांमध्ये १५ हजार ५९६ जागा रिक्त हाेत्या. त्यासाठी ७७ हजार ५३१ अर्ज प्राप्त झाले हाेते. लाॅटरीच्या माध्यमातून नियमित प्रवेश फेरीसाठी निवड केलेल्या १५ हजार ५०१ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ६९६ प्रवेश निश्चित झाले. त्यानंतर पहिल्या प्रतिक्षा यादीत ४ हजार ४९४ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४१४ तसेच तिसऱ्या प्रतिक्षा यादीत १६२७ पैकी ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. एकुण १३ हजार ७७२ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून १ हजार ८२४ जागा रीक्त आहेत.

प्रवेश फेरी                   निवड                प्रवेश निश्चित

नियमित प्रवेश फेरी :  ९४ हजार ७००       ६४ हजार ०४०
पहिली प्रतिक्षा यादी :  २५ हजार ८९८       १३ हजार ६९०
दुसरी प्रतिक्षा यादी :   ८ हजार ८२७           ३ हजार २१५

Web Title: 81 thousand children admitted under RTE 21 thousand seats are vacant in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.