म्हाडा घरांसाठी एकाच दिवसांत ८१ हजार नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:54+5:302020-12-12T04:28:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ५ हजार ६५७ घरांसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ५ हजार ६५७ घरांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) च्या वतीने ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी गुरूवार (दि. १०) पासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून याला चांगला प्रतिसाद मिळत असून, एकाच दिवसांत ८१ हजार लोकांनी नोंदणी केल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.
माने पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी ही म्हाडाची सोडत आहे. यात म्हाडाचे स्वत:च्या घरांसह ४८ नामांकित बांधकाम व्यावसायिकांकडून म्हाडाला दिलेल्या १ हजार ४३० घरांचा समावेश आहे. यासाठी ११ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.