म्हाडाची ८१२ घरांची सोडत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 02:13 AM2018-12-20T02:13:05+5:302018-12-20T02:13:22+5:30

३७०० घरे : जानेवारीत लॉटरी काढणार

812 houses vacated in MHADA | म्हाडाची ८१२ घरांची सोडत जाहीर

म्हाडाची ८१२ घरांची सोडत जाहीर

Next

पुणे : पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडा) बुधवारी ८१२ घरांसाठी आॅनलाइन सोडत काढली. या सोडतीमध्ये नावे आलेल्यांना येत्या ५ जानेवारीपर्यंत कागदपत्रे आणि दहा टक्के रक्कम आॅनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. नियोजित कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींची घरे रद्द करण्यात येणार आहे; तसेच तीन हजार सातशे घरांसाठीची पुढील लॉटरी येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात येणार आहे.

म्हाडातर्फे सकाळी अकरा वाजता अल्पबचत भवन येथे सोडत जाहीर करण्यात आली. बुधवारी झालेल्या सोडतीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनुक्रमे २४२ आणि ५७० अशा ८१२ घरांचा समावेश होता. त्यासाठी ३६ हजार ५६५ जणांनी अर्ज भरले होते. या सोडतीमध्ये घरे मिळालेल्या नागरिकांना पाच जानेवारीपर्यंत संबंधित कागदपत्रे व ‘लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन’या संकेतस्थळावर सादर करावी लागणार आहेत. पुण्यात महंमदवाडी, धानोरी, पाषाण, बावधन, येवलेवाडी आणि आंबेगाव बुद्रुक, तर पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर, ताथवडे, किवळे, रहाटणी, पिंपळे निलख, बोºहाडेवाडी, मोशी, चिखली आणि चोवीसवाडी येथील प्रकल्पांमधील घरे आहेत. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील
यांच्या उपस्थितीत सोडत काढली.

या सोडतीनंतर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढल्या जाणाºया तीन हजार सातशे घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. या सोडतीची घरे पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथील आहेत. वन अ‍ॅण्ड टू बीएचके आणि रो हाऊस या स्वरूपाची ही घरे आहेत.

Web Title: 812 houses vacated in MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.