जिल्ह्यात ८१.४७ टक्के मतदान, शिरूर, वेल्हा, मावळमध्ये सर्वाधिक मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:56 AM2017-12-27T00:56:41+5:302017-12-27T00:56:44+5:30
पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ८१.४७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिरूर तालुक्यात ९१.४५ टक्के झाले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिली.
पुणे : पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ८१.४७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिरूर तालुक्यात ९१.४५ टक्के झाले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिली.
जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिरूर तालुक्यात ९१.४५ टक्के झाले. त्या खालोखाल वेल्हे तालुक्यात ९१.४० टक्के, मावळ तालुक्यात ९०.२० टक्के, पुरंदर तालुक्यात ८९.८९ टक्के, खेड तालुक्यात ८७.६५ टक्के, बारामती तालुक्यात ८५.५२ टक्के, आंबेगाव तालुक्यात ८५.०३ टक्के, भोर तालुक्यात ८३.६६ टक्के, दौंड तालुक्यात ८०.५९ टक्के, मुळशी तालुक्यात ७८.८५ टक्के, हवेली तालुक्यात ७८.१७ टक्के आणि
जुन्नर तालुक्यात ७६.२९ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील या ८९ ग्रामपंचायतीत झालेल्या निवडणुकीत स्त्री मतदार ९५ हजार ३२५ तर
पुरूष मतदार १ लाख २ हजार
८८८ असे एकूण १ लाख ९८ हजार
१२३ मतदार होते. त्यापैकी स्त्री
मतदार ७६ हजार २२१, तर
पुरूष ८५ हजार २६८ असे
एकूण १ लाख ६१ हजार ४९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
>मतदान प्रक्रिया शांततेत
जिल्ह्यात सर्वाधिक जुन्नर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. त्याखालोखाल बारामती तालुका १५, मुळशी तालुका १४, हवेली आणि आंबेगाव तालुका प्रत्येकी ९, भोर तालुका ८, मावळ तालुका ७, वेल्हा तालुका ३, पुरंदर तालुका २, दौंड आणि शिरूर तालुक्यात प्रत्येकी एक ग्रामपंचायत अशा जिल्ह्यात एकूण ८९ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले.
सकाळी साडेसात ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत या ८९ ग्रामपंचायतीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.