८२ टक्के कोरडवाहूंना न्याय देणार

By admin | Published: April 27, 2015 04:51 AM2015-04-27T04:51:13+5:302015-04-27T04:51:13+5:30

दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत.

82 percent of the drylands will be judged | ८२ टक्के कोरडवाहूंना न्याय देणार

८२ टक्के कोरडवाहूंना न्याय देणार

Next

खळद : दुष्काळी पुरंदरला न्याय देणारच, गुंजवणीचे पाणी आणणारच पण याचबरोबर राज्यात अडचणीत असणारे १९२ तालुके आहेत. आघाडी सरकारच्या काळात हजारो कोटींचे घोटाळे झाले; पण सिंचन क्षेत्र मात्र १८ टक्के इतकेच राहिले, तर ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. सध्या येथील शेतकरी अडचणीत आहे. या लोकांना न्याय देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक काम या पुढील काळात करणार असल्याचे राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
खळद येथे जलयुक्त शिवार अभियानअंर्तगत नाला खोलीकरण, २० लाख रुपये खर्चाचे गावठाण ते घोडकेमळा रस्ता डांबरीकरण, दशक्रिया विधी घाट या कामांचे भूमिपूजन तसेच, शाखा नूतनीकरण व नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख पुरंदर दिलीप यादव, हवेली तालुका प्रमुख संदीप मोडक, युवासेना अध्यक्ष उमेश गायकवाड, उपतालुका प्रमुख कैलास कामथे, सुभाष गायकवाड, धीरज जगताप, रमेश इंगळे, नामदेव झुरंगे, मंडल कृषी अधिकारी मासाळ, कृषी सहायक संजीव किरकोळे, नंदकुमार कामथे, एकनाथ कामथे, संतोष कामथे, उत्तम कामथे, बबन कामथे, सुदाम कामथे, संजय कामथे, संदीप कामथे, राजू मुलाणी, शिवाजी कामथे, वसंत कामथे, दत्तात्रय कामथे, कैलास खळदकर, यशवंत इभाड, मंगेश कामथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिक नंदकुमार कामथे यांनी चव्हाणवाडी-तेगोटेमाळ रस्ता पाच वर्षांत आश्वासन
देऊनही आजपर्यंत पूर्ण झाला नाही, आता तरी तो पूर्ण करा अशी मागणी केली. जालिंदर काळे यांनी सूत्रसंचालन, तर अमित कामथे यांनी प्रास्ताविक तसेच नीलेश कामथे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: 82 percent of the drylands will be judged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.