वीर धरणात ८२.५६ टके भरले; पुढील २४ तासात पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 01:12 PM2022-07-14T13:12:17+5:302022-07-14T13:13:25+5:30

वीर धरणाची क्षमता ९.५० टीएमसी आहे....

82.56 per cent filled in Veer Dam Discharge of water will take place in next 24 hours | वीर धरणात ८२.५६ टके भरले; पुढील २४ तासात पाण्याचा विसर्ग

वीर धरणात ८२.५६ टके भरले; पुढील २४ तासात पाण्याचा विसर्ग

googlenewsNext

नीरा (पुणे) : पुरंदर व खंडाळा तालुक्याच्या सिमेवरुन वाहत असलेल्य नीरा नदिवरील वीर धरणात मागील आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. ९.५० टीएमसी क्षमता असलेल्या वीर धरणात गुरवारी सकाळपर्यंत ७.७६ टीएमसी म्हणजे ८२.५६ टक्के भरल्याने आता पुढील २४ तासांत केंव्हाही धरणातून पाणी सोडण्याची सुचना धरण प्रशासनाने केली आहे. 

धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. १४/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७८.३२ मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ७.७६ टीएमसी झाला असून धरण ८२.५३% इतके भरले आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत संततधार पाऊस पडत असून वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पुढील २४ तासात विसर्ग सुटण्याची शक्यता आहे.

तरी नदी काठच्या लोकांना सुरक्षिततचेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आव्हान धरण प्रशासनाने केले आहे.

Web Title: 82.56 per cent filled in Veer Dam Discharge of water will take place in next 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.