इंदापूर तालुक्यातील रस्ते व पूल होणार चकाचक, ८३ कोटी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:44+5:302021-07-18T04:08:44+5:30

यासंदर्भात माहिती देताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुका हा विकासकामांमध्ये कधीही मागे राहू नये. यासाठी ...

83 crore fund sanctioned for roads and bridges in Indapur taluka | इंदापूर तालुक्यातील रस्ते व पूल होणार चकाचक, ८३ कोटी निधी मंजूर

इंदापूर तालुक्यातील रस्ते व पूल होणार चकाचक, ८३ कोटी निधी मंजूर

Next

यासंदर्भात माहिती देताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुका हा विकासकामांमध्ये कधीही मागे राहू नये. यासाठी अर्थसंकल्प निधीतून तालुक्यातील पिंपळे ते शेटफळगढे रस्ता (९ कोटी), कळस ते लाकडी रस्ता (१२ कोटी), कळस येथील बिरोबा मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग ते डाळज नं.२ पर्यंतचा रस्ता (२ कोटी), विठ्ठलवाडी (कळस) ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता (२ कोटी), पारेकरवस्ती ते निसर्ग हॉटेलपर्यंतचा रस्ता, कर्मयोगी साखर कारखाना ते इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान कॉलेजपर्यंतचा रस्ता व इंदापूर बेडशिंगे रोड ते गलांडवाडी नं. २ ते बाभूळगाव पर्यंतच्या रस्त्यासाठी १५ कोटी, भोंगवस्ती ते कर्मयोगी साखर कारखान्यापर्यंतचा रस्ता व कालठण नं. २ ते शिरसोडी ते भीमा नदीपर्यंतच्या रस्त्यासाठी ५ कोटी, असा निधी मंजूर झालेला आहे.

तर इंदापूर तालुक्यातील सराटी, रेडा, शेटफळ हवेली, नीरनिमगाव या गावातील नागरिकांना अशी सातत्याने आपल्या भागातील रस्ते करण्यासाठी मागणी होती. त्यामुळे या गावातील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. पुढीलप्रमाणे यामध्ये, निरनिमगाव ते कचरवाडी ते सराटी ते चाकाटी रस्ता व सराटी ते गणेशवाडी रस्त्यासाठी ९ कोटी,पळसदेव ते न्हावी ते थोरातवाडी ते व्याहाळी रस्त्यासाठी १२ कोटी,भावडी फाटा ते चांडगाव रस्त्यासाठी ३ कोटी तर रेडा ते शेटफळ हवेली या रस्त्यासाठी ६ कोटींचा निधी दिला आहे.तर अकोले ते कळस रस्त्यावरील ओढ्यावरील पूल बांधण्यासाठी अडीच कोटी तर याच रस्त्यावरील मुठा उजव्या कालव्यावर पूल बांधण्यासाठी दीड कोटींचा निधी दिला आहे.तसेच तावशी ते थोरातवाडी रस्त्यावरील दोन ठिकाणच्या ओढ्यांवर पूल बांधण्यासाठी दीड कोटींचा निधी दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याचे परिपक्व जाळे अद्ययावत निर्माण करण्यासाठी मंजूर केला आहे. कामे चालू आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक दळणवळणाची सुविधा इंदापूर तालुक्यात अद्ययावत निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे यांनी दिली. फोटो ओळ : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Web Title: 83 crore fund sanctioned for roads and bridges in Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.