कोरोनामुळे जिल्ह्यात ८३ हजार खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:51+5:302021-07-01T04:08:51+5:30

पुणे : कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने रुग्णांची ससेहोलपट ...

83,000 beds in the district due to corona | कोरोनामुळे जिल्ह्यात ८३ हजार खाटा

कोरोनामुळे जिल्ह्यात ८३ हजार खाटा

Next

पुणे : कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने रुग्णांची ससेहोलपट झाली. त्यामुळे प्रशासनाकडून आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील रुग्णालयांमधील खाटांची संख्या, ऑक्सिजन प्रकल्प, व्हेंटिलेटरच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ८३-८५ हजार खाटा, १८००-२००० व्हेंटिलेटर खाटा तर १५ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहेत.

कोविड पोर्टल डेटानुसार, जिल्ह्यात २२५ कोविड केअर सेंटर, ६१५ डीसीएचसी, तर ६४ डीसीएच हॉस्पिटल आहेत. सध्या १५ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प असून, ४३ प्रस्तावित ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहेत. आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव तरतूदही करण्यात आली आहे.

तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये ३ हजार ४६९ खाटांचे, तर खासगी रुग्णालयांमध्ये २ हजार ६८७ खाटांचे राखीव ठेवण्यात आले आहेत. येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटल, न्यू बाणेर, अण्णासाहेब मगर हॉस्पिटल, नवीन जिजामाता हॉस्पिटल लहान मुलांसाठी सज्ज करण्यात येत आहे.

ऑक्सिजन खाटांची माहिती :

कार्यक्षेत्र रुग्णालये उत्पादन क्षमता

पुणे शहर ५ ३९५० एलपीएम

पिंपरी चिंचवड २ २०१० एलपीएम

पुणे ग्रामीण ८ २५८४ एलपीएम

-----------

एकूण १५ ८५४४ एलपीएम

-----

खाटांची संख्या

कार्यक्षेत्र ऑक्सिजन आयसीयू व्हेंटिलेटरविरहित

पुणे १८५१७ ७८७६ १११४ ८३०

पिं.चिं. १८८२८ ३७८६ १०६१ ४८०

ग्रामीण २४५१८ ५५२९ १५८४ ५७७

-----------------------------------------

एकूण ६१,८६३ १७१९१ ३७५९ १८८७

Web Title: 83,000 beds in the district due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.