तीन महिन्यात ८३ हजार नोंद निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:18+5:302021-03-10T04:12:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत घेण्यात येते. यात गेल्या तीन महिन्यांत घेतलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत घेण्यात येते. यात गेल्या तीन महिन्यांत घेतलेल्या फेरफार अदालतमध्ये ८३ हजार नोंद निकाली काढण्यात आल्या. जिल्ह्यात फेरफार अदालत मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्ह्यात दर महिन्याच्या दुस-या बुधवारी मंडळस्तरावर फेरफार अदालत घेऊन यात जनतेच्या प्रलंबित साध्या वारस तक्रारी, नोंदी निर्गत करण्यात येतात. या फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने यापुर्वीच प्रलंबित नोंदीबाबत विशेष मोहीम घेऊन मागील तीन महिन्यात ८३ हजार ०७४ नोंदी निर्गत केल्या आहेत.
चौकट
अजूनही २७ हजार नोंदी प्रलंबित
जिल्हयात २७ हजार ३२ नोंदी अजून प्रलंबित असून त्यापैकी १७ हजार ४५३ नोंदी, नोटीस काढणे व बजावणेवर प्रलंबित आहेत. ९ हजार ५७९ नोंदी प्रमाणीकरणासाठी उपलब्ध असून यापैकी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने फेरफार अदालतीत प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन नोंदी निर्गत करुन घ्याव्यात.