केडगावला ८३१ कांदा गोण्यांची आवक, बाजारभाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:42+5:302021-04-14T04:09:42+5:30

-- कांद्याचे लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांत समाधान -- दौंड - दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगाव येथे कांद्याच्या ...

831 onion sacks arrive in Kedgaon | केडगावला ८३१ कांदा गोण्यांची आवक, बाजारभाव तेजीत

केडगावला ८३१ कांदा गोण्यांची आवक, बाजारभाव तेजीत

Next

--

कांद्याचे लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांत समाधान

--

दौंड - दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगाव येथे कांद्याच्या लिलावास सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी ८३१ कांद्यांच्या पिशव्यांची आवक होऊन प्रति क्विंटलला एक हजार ते बाराशे रुपये बाजारभाव मिळाला.

कांदा लिलाव सुरु करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती. दरम्यान, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कांद्याचा लिलाव सुरु झाल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. कांदा लिलावाचे उदघाटन खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण दिवेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, कामगार आणि शेतकरी उपस्थित होते.

दौंड तालुक्यात भुसार मालाची आवक वाढल्याने बाजारभाव तेजीत निघाले, तर पालेभाज्यांची आवक स्थिर झाल्याने बाजारभावात स्थिर राहिले. टोमॅटो, वांगी, भोपळा, काकडी, कोबी, फ्लाॅवर या भाज्यांचे भाव घसरले असून मिर्ची, कारली, भेंडी, गवार, दोडक्याचे भाव तेजीत असल्याची माहिती सभापती भगवान आटोळे व सचिव मोहन काटे यांनी दिली.

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( १८५ ) ५० ते ११०, वांगी ( ८० ) ५० ते १५० , दोडका ( ३५ ) २०० ते ३०० भेंडी ( ३० ) २०० ते ३२०, कार्ली ( ३६ ) २५० ते ३५० , हिरवी मिरची ( ४५ ) २०० ते ४५०, गवार (१५ ) २००ते ६००, भोपळा ( ६० ) २५ ते ५०, काकडी ( ५५ ) ५० ते १००, शिमला मिरची ( ३१ ) २०० ते ३५ ० , कोबी ( ४१०गोणी ) ५० ते १५० , फ्लाॕवर (३७० गोणी) १०० ते ३००, कोथिंबीर (३५६७० जुडी) २०० रुपये शेकडा ते ८०० शेकडा, मेथी (३९५०जुडी) ५००ते ८०० शेकडा.

दौंड - शेतीमालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( ८४९ ) १६५० ते २००० , ज्वारी ( ४३ ) , १६०० ते २१०० बाजरी ( ४१ ) १३०० ते १८००, हरभरा ( १८ ) ४५०० ते ४८०० मका ( ३५ ) १३०० ते १३००,तूर उपबाजार केडगाव -- गहू ( ८७९ ) १७७०ते २२००, ज्वारी ( १६३ ) १८५० ते ३१५०, बाजरी ( १७८ ) १२०१ ते १८०१ , हरभरा ( १९५ ) ४९६० ते ५२११ , मका-- लाल -- पिवळा ( १५ ) १३०१ ते १५०१ , तूर (.१९ ) ५८०० ते ६१००, लिंबू ( ८५ डाग ) ५०१ ते १६००

उपबाजार पाटस : गहू एफ.ए.क्यू ( ३९ ) १७११ ते १८५० , बाजरी ( ९ ) १२२५ते १५१० , हरभरा ( ४ ) ४५५१ ते ४५६१

--

फोटो क्रमांक : १३ दौड कांदा बाजार

फोटो ओळी: दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार केडगावला कांद्याची झालेली मोठी आवक.

Web Title: 831 onion sacks arrive in Kedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.