'क्रिप्टो'मध्ये गुंतवणूक करताय? तर ही बातमी नक्की वाचा, गुंतवणुकदारांला ८४ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 10:52 AM2022-03-02T10:52:00+5:302022-03-02T10:53:46+5:30

पुण्यातील गुंतवणूकदारांची ८४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक...

84 lakh bribe in the lure of investing in virtual currency | 'क्रिप्टो'मध्ये गुंतवणूक करताय? तर ही बातमी नक्की वाचा, गुंतवणुकदारांला ८४ लाखांचा गंडा

'क्रिप्टो'मध्ये गुंतवणूक करताय? तर ही बातमी नक्की वाचा, गुंतवणुकदारांला ८४ लाखांचा गंडा

googlenewsNext

पुणे :पुणे शहरातील गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकास पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणात अटक केलेला आरोपी दुबईत वास्तव्यास होता. ताे पुन्हा दिल्लीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने पुण्यातील गुंतवणूकदारांची ८४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गणेश शिवकुमार सागर (वय ४७, रा. द्वरका, नवी दिल्ली) असे त्याचे नाव आहे. दुबईतील बिटसोलाइव्हज तसेच इंग्लंडमधील बुलइन्फोटेक कंपनीकडून भारतात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गुंतवणूक केल्यास आकर्षक परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. कंपनीकडून कोणताही परतावा देण्यात आला नव्हता तसेच संकेतस्थळही बंद असल्याचे लक्षात आले होते. सायबर पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये यासंबंधी ८ गुन्हे दाखल केले होते.

गणेश सागर दुबईतील बिटसोलाइव्हज कंपनीचा संचालक असून तो दुबईत वास्तव्यास असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेतील तांत्रिक तपासात मिळाली होती. सागर नुकताच दिल्लीत परतला होता. त्याच्या ठावठिकाणा समजल्यानंतर पोलिसांचे पथक दिल्लीत रवाना झाले आणि त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, अंकुश चिंतामण, संगीता माळी, सहायक निरीक्षक शिरीष भालेराव, हवालदार अस्लम आत्तर, मंगेश नेवसे, अंमलदार शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, योगेश वाव्हळ, नितेश शेलार, प्रवीणसिंग राजपूत, अंकिता राघो, सारिका दिवटे, दिनेश मरकड, किरण जमदाडे यांनी कारवाई केली.

भारतामध्ये क्रिप्टो करन्सी नियंत्रण व नियमनाबाबत कोणताही कायदा नाही, याचा फायदा घेऊन व्हाइट कॉलर, क्रिमिनल खासगी क्रिप्टो किंवा टोकन बाजारात आणतात. प्री लॉन्च ऑफर देऊन, अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. यासाठी भव्यदिव्य कार्यशाळा आयोजित करतात. सेलिब्रिटी बोलवितात व क्रिप्टो करन्सी कशी कायदेशीर आहे व अर्थव्यवस्थेचे भवितव्य आहे, हे लोकांना पटवून देतात. हजारो कोटींची माया जमवून देश-विदेशात परागंदा होता. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अवास्तव परताव्याच्या फसव्या स्किमला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलीस करीत आहेत.

Web Title: 84 lakh bribe in the lure of investing in virtual currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.