बारामतीत दोन लाखांचे ८४९७ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:54+5:302021-07-10T04:09:54+5:30

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील खर्डाच्या शिवकृपा दूध संकलन केंद्रातून बारामती येथे आलेले भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले ...

8497 liters of adulterated milk worth Rs 2 lakh seized in Baramati | बारामतीत दोन लाखांचे ८४९७ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

बारामतीत दोन लाखांचे ८४९७ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

Next

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील खर्डाच्या शिवकृपा दूध संकलन केंद्रातून बारामती येथे आलेले भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. तब्बल २ लाख २९ हजार २९ हजार ४१९ रुपयांचे ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त गाईचे दूध पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाने जप्त केले आहे.

जामखेड येथून टँकरमधून (एम.एच ११/ए.एल ५९६२) सुमारे ८ हजार लिटर भेसळयुक्त दूध येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. परिमंडळ ५ चे सहायक आयुक्त (अन्न) अर्जुन भुजबळ यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश, बालाजी शिंदे आणि पुणे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास मंडळाचे राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने बारामती येथे जाऊन छापा टाकून कारवाई केली. टँकरचालक संपत भगवान ननावरे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने हे भेसळयुक्त दूध शिवकृपा दूध संकलन केंद्राचे असल्याचे सांगितले. पथकातील अधिकाऱ्यांनी दुधाची तपासणी केली. तेव्हा भेसळयुक्त तसेच कमी दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दुधाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित २ लाख २९ हजार ४१९ रुपयांचे ८ हजार ४९७ लिटरचा साठा जप्त करून बारामती नगरपरिषदेच्या मैदानावर नष्ट केले.

Web Title: 8497 liters of adulterated milk worth Rs 2 lakh seized in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.