बारामतीत ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 22:15 IST2021-07-09T22:14:46+5:302021-07-09T22:15:03+5:30
२ लाख २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटरचा साठा जप्त

बारामतीत ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्रातून बारामती येथे आलेले भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. तब्बल २ लाख २९ हजार २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त गाईचे दूध पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाची कारवाई करत जप्त केले आहे.
जामखेड येथून टॅँकर (एम.एच ११/ए.एल ५९६२) मधून सुमारे ८ हजार लिटर भेसळयुक्त दूध येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. परिमंडळ ५ चे सहायक आयुक्त (अन्न) अजुर्र्न भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश, बालाजी शिंदे आणि पुणे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास मंडळाचे राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने बारामती येथे जाऊन छापा टाकून कारवाई केली. टॅँकरचालक संपत भगवान ननावरे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने शिवकृपा दूध संकलन केंद्राचे असल्याचे सांगितले. पथकातील अधिकाऱ्यांनी दुधाची तपासणी केली. तेव्हा भेसळयुक्त तसेच कमी दजार्र्चे असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दुधाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित २ लाख २९ हजार ४१९ रूपयांचे ८ हजार ४९७ लिटरचा साठा जप्त केला आहे. तसेच बारामती नगरपरिषदेच्या मैदानावर नष्ट केले.