ओल्या कचऱ्यापासून दर महिन्याला ८५० टन सेंद्रिय खत तयार; पुणे महापालिकेचा उपक्रम
By निलेश राऊत | Published: August 17, 2023 05:00 PM2023-08-17T17:00:30+5:302023-08-17T17:00:40+5:30
जुलै २०२३ पर्यंत तब्बल ६१ हजार २०० मेट्रिक टन सेंद्रिय खत निर्मिती करण्यात आली असून, हे खत शेतकऱ्यांना नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून दिले गेले
पुणे: महापालिकेच्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाला राज्य शासनाने ' हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड ' वापरण्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित ठेकेदार कंपनीला शहरी सेंद्रिय खत तयार करून शेतकऱ्यांना विक्रीसाठी आता राज्यभर खत विक्री करता येणार आहे.
दरम्यान राज्य शासनाकडून ही मान्यता मिळण्यापूर्वीच महापालिका भुमी ग्रीन एनर्जी या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून दररोज २०० में.टन क्षमतेच्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून दर महा पासून ८५० में.टन सेंद्रिय खत तयार करीत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.
महापालिकेकडून ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. यात जुलै २०१७ पासून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. जुलै २०२३ पर्यंत तब्बल ६१ हजार २०० मेट्रिक टन सेंद्रिय खत निर्मिती करण्यात आली असून, हे खत शेतकऱ्यांना नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून दिले गेले आहे. महापालिकेच्या हडपसर येथील कचरा रॅम्पवर येथे १५० टन तर उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ३५० टन क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहेत. याठिकाणी दररोज येणारा ओला कचरा टीफिने फ्लोर वरती घेतला जातो. व ओल्या कचऱ्यावरती जैविक डीकॉम्पोसरची फवारणी केली जाते. त्यानंतर फावरणी केलेल्य मालची हिप केली जाऊन, त्यामधूम पाणी कमी होण्यासाठी मालाची अदला- बदल केली जाते. ४५ दिवसांनी तयार झालेल्या मालाची प्रोसेसिंग करून,त्यातून कम्पोस्टिंग झालेले मालापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. या दोन्ही प्रकल्पातील खताचे नमुने महापालिकेने शासनाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. हे खत तपासून त्याची गुणवत्ता योग्य असल्याचे नमूद करून शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत ' हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड ' ची महापालिकेला मान्यता दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले.