जिल्ह्यात ८५ हजार निराधारांना मिळणार प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:48+5:302021-04-15T04:10:48+5:30

पुणे : जिल्ह्यात विविध निराधार योजनांचे तब्बल ८५ हजारपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ...

85,000 destitute people in the district will get assistance of one thousand rupees each | जिल्ह्यात ८५ हजार निराधारांना मिळणार प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत

जिल्ह्यात ८५ हजार निराधारांना मिळणार प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत

Next

पुणे : जिल्ह्यात विविध निराधार योजनांचे तब्बल ८५ हजारपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणारे प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वेगाने वाढत आहे. सध्या ही संख्या एवढी झपाट्याने वाढत आहे की, रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल अखेरपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. शासनाकडून लाॅकडाऊनची चर्चा सुरू असताना सर्व स्तरातून विरोध होत होता. गरीब व सर्वसामान्य लोकांनाच्या हातावर पोट असलेल्या लोकांची सोय करण्याची मागणी होत होती. यामुळेच राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना या पाच योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

--

जिल्ह्यात या योजनाचे हे आहेत लाभार्थी

- संजय गांधी निराधार योजना : ४२ हजार १९४

- श्रावण बाळ राज्य निवृत्ती योजना : ३१ हजार ६३८

- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना : १० हजार ३६०

- इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना : १२७

- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना : ७६९

Web Title: 85,000 destitute people in the district will get assistance of one thousand rupees each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.