घरफोडी करून १९ तोळ््यांसह ८६ हजारांची रोकड लंपास
By admin | Published: July 8, 2017 02:08 AM2017-07-08T02:08:25+5:302017-07-08T02:08:25+5:30
येथील शिंदेनगर येथे भरदुपारी घरफोडी करून १९ तोळे सोने आणि ८६ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. शुक्रवारी दुपारी बारा ते
लोकमत न्यूज नेटवर्क
राहू : येथील शिंदेनगर येथे भरदुपारी घरफोडी करून १९ तोळे सोने आणि ८६ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. शुक्रवारी दुपारी बारा ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, तर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी : या ठिकाणी शांताराम जयवंत शिंदे अकरा वाजण्याच्या सुमारास राहू गावाजवळ उसाची तोड चालू असल्याने गेले होते. पत्नी आश्विनी व आई गंगूबाई या दोघी घराजवळील हाकेच्या अंतरावर भाजीपाला काढण्याचे काम करीत होत्या. या काळात काही अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील दोन कपाटे व कपाटाचा लॉकर तोडून ऐवज लंपास केला. भाजी काढून झाल्यावर घरी आल्यानंतर आश्विनी व गंगूबाई यांनी परिस्थिती पाहिल्यानंतर शांताराम शिंदे यांना कळविले. त्यांनी यवत पोलिसांत माहिती दिल्यानंतर यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की या घटनेबाबत तपास सुरू आहे.
वाढती लोकसंख्या विचारात घेता राहू गावामध्ये पोलीस ठाणे असावे, अशी मागणी राहू भामा आसखेड कृती समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.