बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:20 AM2023-04-13T11:20:57+5:302023-04-13T11:25:01+5:30

या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली....

861 Barty students granted fellowships; The demand of the agitating students was accepted by the Chief Minister | बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य

बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर; आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य

googlenewsNext

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्या वतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशिपकरिता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयाचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. यापुढे फेलोशिपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.

फेलोशिप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते.

Web Title: 861 Barty students granted fellowships; The demand of the agitating students was accepted by the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.