खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा ४.६७ टीएमसीने जादा पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 02:44 PM2023-08-08T14:44:03+5:302023-08-08T14:44:33+5:30

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत २५.९१ टीएमसी म्हणजे ८८.८९ टक्के पाणीसाठा ...

88 percent water storage in Khadakwasla dam chain; 4.67 TMC more water than last year | खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा ४.६७ टीएमसीने जादा पाणी

खडकवासला धरण साखळीत ८८ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा ४.६७ टीएमसीने जादा पाणी

googlenewsNext

पुणे :पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत २५.९१ टीएमसी म्हणजे ८८.८९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४.६७ टीएमसीने म्हणजे १६.०३ टक्के पाणीसाठा जादा आहे.

राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे बुधवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या चारही धरणांत २५.९१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

धरण            टीएमसी             टक्के

खडकवासला - १.८३ ९२.६१

पानशेत - १०. २९ ९६.६२

वरसगाव - ११.२४ ८७.६६

टेमघर - २.५६ ६८.९५

एकूण - २५.९१ ८८.८९

Web Title: 88 percent water storage in Khadakwasla dam chain; 4.67 TMC more water than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.