जिल्ह्यात ८८ हजार ७२४ दुबार मतदार; ५५ हजार दुबार मतदारांची नावे वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:16+5:302021-08-22T04:14:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या दुरूस्ती व अद्ययावत करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने ...

88 thousand 724 double voters in the district; The names of 55,000 double voters were omitted | जिल्ह्यात ८८ हजार ७२४ दुबार मतदार; ५५ हजार दुबार मतदारांची नावे वगळली

जिल्ह्यात ८८ हजार ७२४ दुबार मतदार; ५५ हजार दुबार मतदारांची नावे वगळली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या दुरूस्ती व अद्ययावत करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. यामध्ये मतदारयादीतील दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्ह्यात तब्बल ८८ हजार ७२४ दुबार मतदार असून, आतापर्यंत तब्बल ५५ हजार ८८९ दुबार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक दुबार मतदार खडकवासला आणि हडपसर मतदारसंघात आढळून आले आहेत.

पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ असून, जिल्ह्याची मतदारसंख्या ७८ लाख ८७ हजारांच्या घरात पोहचली आहे. यामध्ये बहुतेक सर्व मतदारसंघांत प्रामुख्याने शहरी भागात दुबार मतदारांची संख्या खूप मोठी आहे. जिल्ह्यातील अनेक मतदारांची शहरात आणि ग्रामीण भागात आपल्या गावाकडेदेखील मतदार म्हणून नोंद असते. शहरी भागात एक किंवा दोनपेक्षा अधिक ठिकाणी मतदार म्हणून यादीत नाव असलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून आपल्याला अपेक्षित लोकांची नावे मतदारयादीत नोंदवून घेतली जातात. यामुळेच दुबार मतदारांची संख्या वाढत जाते. परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दुबार, छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात कोणत्याही एकाच मतदार संघात नाव ठेवण्यासाठी अर्ज भरून देणे, अपेक्षित कागदपत्रे जमा करणे, पुरावे देण्यासाठी मतदारांना संधी देण्यात येते. त्यानंतर पुरावे व कागदपत्रे न देणाऱ्या दुबार मतदारांची नावे अखेर यादीतून वगळण्यात येतात. जिल्ह्यात अद्यापही ३२ हजार ८३५ दुबार मतदार असून, ही नावे देखील लवकरच यादीतून वगळण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले.

-------

मतदारयादीतून वगळण्यात आलेले दुबार मतदार

जुन्नर ७११, आंबेगाव ११५१, खेड-आंळदी ५८६, शिरूर ६२३६, दौंड २४१८, इंदापूर १०१०, बारामती ३५५९, पुरंदर १९२८, भोर २०१५, मावळ ३७५८, चिंचवड ४३२०, पिंपरी ३०७४, भोसरी ३४७६, वडगावशेरी २८४१, शिवाजीनगर ९९४, कोथरूड १२३२, खडकवासला ७१८२, पर्वती २३९६, हडपसर ४३२७, पुणे कॅन्टोन्मेंट ८१२, कसबा पेठ १८६३, एकूण ५५ हजार ८८९.

------

Web Title: 88 thousand 724 double voters in the district; The names of 55,000 double voters were omitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.