शिरूर बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान

By Admin | Published: May 21, 2017 03:48 AM2017-05-21T03:48:13+5:302017-05-21T03:48:13+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज ९८ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. उद्या रविवारी साई गार्डन मंगल कार्यालयात मतमोजणी

89 percent polling for Shirur Bazar Samiti | शिरूर बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान

शिरूर बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज ९८ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडले. उद्या रविवारी साई गार्डन मंगल कार्यालयात मतमोजणी होणार असून, राष्ट्रवादी की भाजपाचा पॅनल यात बाजी मारतो, याचे चित्र स्पष्ट होईल.
बाजार समितीच्या १७ जागांसाठी आज सकाळी एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या ३, सोसायटी मतदारसंघाच्या ११, व्यापारी मतदारसंघाच्या २ तर हमाल तोलार मतदारसंघासाठी १ अशा १७ जागांसाठी मतदान झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेस विरुद्ध भाजपा अशा दोन पॅनलमध्ये लढत झाली. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. यामुळे ‘अर्थ’पूर्ण प्रचार दोन्ही बाजूंनी झाला. १० हजार ते २५ हजार प्रतिमत, असा भाव फुटला. याचा परिणाम ९८ टक्के मतदान झाले. सर्व मतदारसंघ मिळून ३,३०९ मतांपैकी ३,२५७ मतदान झाले. यात सोसायटी मतदारसंघासाठी एकूण १,५६८ पैकी १,५४६, ग्रामपंचायत मतदारसंघासाठी ९४४ पैकी ९३७ व्यापारी व अडते मतदारसंघासाठी ५८१ पैकी ५६२ तर हमाल तोलारी मतदारसंघासाठी २१६ पैकी २१२ असे मतदान झाले. तालुक्यात एकूण १६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या. मर्यादित मतदारसंख्या व या मतदारांची घेण्यात आलेली ‘अर्थ’पूर्ण काळजी यामुळे भरउन्हातही मतदारांनी मतदानाला येण्यास पसंती दिली. आमदार बाबूराव पाचर्णे यांचे राजकीय तारे सध्या गर्दीशमध्ये आहेत. अशातच बाजार समितीची निवडणूक जिंकून तारे चमकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार, पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने आमदारांची पराभवाची मालिका खंडित होऊ नये, याची काळजी घेतल्याचे दिसून आले. उद्याच्या निकालात नेमके काय घडते ते स्पष्ट होईलच. आमदार पाचर्णे यांच्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीत एकही जागा निवडून आणता आली नाही. जि. प. निवडणुकीत तर त्यांना आपल्या मुलाच्या पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे या निकालालकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.

निमोणेत शांततेत मतदान
निमोणे : न्हावरे मतदान केंद्रावर, शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत झाली. शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी (दि. २०) झाली. या निवडणुकीसाठी निर्धारित केलेल्या मोजक्या मतदान केंद्रापैकी न्हावरा हे एक होते. या केंद्राच्या अंतर्गत न्हावरा, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, करडे, आंबळे, कळवंतवाडी, रांजणगाव सांडस, राक्षेवाडी, आलेगाव पागा, अरणगाव, उरळगाव, कोकडेवाडी या गावांचा समावेश होता.

Web Title: 89 percent polling for Shirur Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.