‘एफडीए’कडून ८९ छापे

By admin | Published: April 19, 2016 12:59 AM2016-04-19T00:59:13+5:302016-04-19T00:59:13+5:30

अन्न व औषध विभागाच्या परिमंडळ चारच्या पथकाने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत वर्षभरात ८९ ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई केली.

89 raids by FDA | ‘एफडीए’कडून ८९ छापे

‘एफडीए’कडून ८९ छापे

Next

भोसरी : अन्न व औषध विभागाच्या परिमंडळ चारच्या पथकाने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत वर्षभरात ८९ ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई केली. जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड हद्दीत टाकलेल्या छाप्यांत सुमारे २२ लाख ८१ हजार ८९९ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
वर्षभरात अन्न व औषध आस्थापनेकडून २८२ तपासण्या घेण्यात आल्या. त्यातील ७८ प्रकरणांतील तडजोडीत २० लाख ६३ हजारांची दंडवसुली करण्यात आली. शहरातील अन्न व्यावसायिकांवर अन्न व औषध विभागातर्फे टाकण्यात आलेल्या छाप्यांत तब्बल २० लाख ६२ हजार रुपये किमतीचा एक हजार ४८ किलो मिल्क केक व स्पेशल बर्फी जप्त करण्यात आली. ती शहरातील या वर्षातील अन्नपदार्थांतील सर्वांत मोठी कारवाई होती.
अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईत वर्षभरात दोन हजार ४२२ किलो भेसळयुक्त साठा सापडला. त्याची किंमत सुमारे २१ लाख ४७ हजार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईत तपासणीसाठी १८६ नमुने घेण्यात आले होते. त्यातील २४ नमुने असुरक्षित आढळून आले, तर २१ नमुने कमी दर्जाचे आढळले. असुरक्षित आढळलेल्या नमुन्यातील खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. कमी दर्जाच्या नमुन्यांची सुनावणी विभागीय अधिकाऱ्यांकडे घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.(वार्ताहर)

Web Title: 89 raids by FDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.