चिंबळी मध्ये ८९.५३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:26+5:302021-01-17T04:11:26+5:30

चिंबळी मध्ये ८९.५३ टक्के मतदान कुरुळी:(ता,खेड) खेड तालुक्यातील दक्षिण भागातील चिंबळी ग्रामपंचायतीमध्ये १३ जागांसाठी शुक्रवारी सरासरी ८९.५३ टक्के ...

89.53 per cent polling in Chimbali | चिंबळी मध्ये ८९.५३ टक्के मतदान

चिंबळी मध्ये ८९.५३ टक्के मतदान

Next

चिंबळी मध्ये ८९.५३ टक्के मतदान

कुरुळी:(ता,खेड) खेड तालुक्यातील दक्षिण भागातील चिंबळी ग्रामपंचायतीमध्ये १३ जागांसाठी शुक्रवारी सरासरी ८९.५३ टक्के मतदान झाले.एकूण ३२८९ पैकी २९१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती तलाठी बी. बी. पाटील,ग्रामविकास अधिकारी पी. व्ही. ढवळे यांनी दिली.

दरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली, यावेळी आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, उपनिरीक्षक इक्बाल शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पृथ्वीराज पाटील, रवींद्र जाधव, सुनील येवले, आनंत जागळे, शिवाजी शिंगाडे, पार्वता रावते, दिपाली सुरकुले, रेखा वाजे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

चिंबळी ग्रामपंचायत वार्ड नुसार झालेले मतदान पुढील प्रमाणे

वार्ड क्रमांक १ मध्ये ६४९ पैकी ५६१ (८०,४४)टक्के

वार्ड क्रमांक २ मध्ये६८२ पैकी ६२४ (९१.४९) टक्के

वार्ड क्रमांक ३मध्ये ५६७ पैकी ४९५ (८९.०४) टक्के

वार्ड क्रमांक ४ मध्ये५६४ पैकी ५२४ (९२.९०) टक्के

वार्ड क्रमांक ५ मध्ये ७९७ पैकी ७१४ (८९.५८) टक्के असे एकूण सरासरी मतदान २९१८ (८९.५३%) झाले.

Web Title: 89.53 per cent polling in Chimbali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.