न्हावरेतील हाणामारी प्रकरणी ९ जणांवर गुन्हे
By admin | Published: April 28, 2017 05:46 AM2017-04-28T05:46:43+5:302017-04-28T05:46:43+5:30
न्हावरे (ता. शिरूर) येथे झालेल्या हाणामारीच्या घटनेत ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांपैकी सहा जणांना
न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथे झालेल्या हाणामारीच्या घटनेत ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांपैकी सहा जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. तिघाजणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.
एकमेकांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. गुरूवारी या घटनेतील आरोपींना शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. घटनेतील आरोपींपैकी अजित धुराजी कोकडे, राजेश धुराजी कोकडे, गणेश धुराजी कोकडे, ज्ञानेश्वर नामदेव कोकडे, आकाश सदाशिव कोकडे, संतोष दिलीप कदम (सर्वजण रा. कोकडेवाडी, न्हावरे) यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे, तर कचरदास किसन चव्हाण, नागेश कचरदास चव्हाण, गणेश कचरदास चव्हाण (रा. न्हावरे) यांची जामिनावर न्यायालयाने मुक्तता केली आहे. न्हावरे येथील आठवडे बाजारात लिलावदार कचरदास चव्हाण यांनी कोकडे यांच्या जागेत बाजार भरू नये, यासाठी वादावादी करत मनात राग धरून अजित धुराजी कोकडे, राजेश धुराजी कोकडे, गणेश धुराजी कोकडे, ज्ञानेश्वर नामदेव कोकडे, आकाश सदाशिव कोकडे, संतोष दिलीप कदम यांनी नागेश चव्हाण, गणेश चव्हाण, कचरदास चव्हाण यांना गज, काठ्यांनी मारहाण केल्याचे कचरदास चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
तर व्यायामशाळेत व्यायाम केल्याचे पैसे मागितले म्हणून तसेच ग्रामपंचायतीच्या बाजार पावतीची मागणी केली म्हणून कचरदास चव्हाण यांनी अजित कोकडे, राजेश कोकडे, गणेश कोकडे, ज्ञानेश्वर कोकडे, दिलीप कदम यांना गज, काठ्यांनी मारहाण केली असल्याचे कोकडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. (वार्ताहर)