जंगी मिरवणूक भोवली; कुख्यात गुंड गजानन मारणेसह ९ जण पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:17 AM2021-02-17T04:17:27+5:302021-02-17T14:06:50+5:30

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर शहरात परतल्यावर कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणे तसेच कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी ...

9 arrested, including Gajanan Marane | जंगी मिरवणूक भोवली; कुख्यात गुंड गजानन मारणेसह ९ जण पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

जंगी मिरवणूक भोवली; कुख्यात गुंड गजानन मारणेसह ९ जण पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर शहरात परतल्यावर कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणे तसेच कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह ९ जणांना अटक केली असून, २७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याचवेळी शरद मोहोळ याच्यासह २० ते २५ जणांवर दहशत निर्माण केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजा कारागृहातून सुटल्यावर त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली होती. त्याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन मारणे हा पुण्यात आल्यानंतर पौड रोडवरील घराबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून फटाक्यांची आतषबाजीही रात्री उशिरा केली होती. या संबंधीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस आक्रमक झाले. त्यांनी या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील समर्थकांची ओळख पटवून आज सकाळपासून त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली. गजानन मारणे याला सकाळीच कोथरूड पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. कायदेशीर बाबींची पुर्तता करून रात्री उशिरा मारणेसह ९ जणांना अटक करण्यात आली असून एकूण २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात गैरकायद्याची मंडळी एकत्रित करणे, परिसरात दहशत निर्माण करणे, कोविड १० नियमांचे उल्लंघन करणे अशा वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, पुणे सुरक्षित ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. सर्व कायदेशीर बाजू तपासून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.

-------------------

शरद मोहोळविरोधात गुन्हा

गेल्या महिन्यात कारागृहातून सुटलेला गॅंगस्टर शरद मोहोळ याच्याविरुद्धही खडक पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. २६ जानेवारी रोजी एका संघटनेने आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजेमध्ये शरद मोहोळ व त्याचे समर्थक आले होते. या वेळी बेकायदेशीरपणे लोकांना एकत्र करून परिसरात दहशत निर्माण करणे व कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणे अशा विविध कलमांखाली शरद माेहोळ व त्याच्या १२ समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद मोहोळच्या शोधासाठी पथक घरी गेले होते. परंतु, तो घरात नसल्याने पोलिसांना मिळू शकला नाही. यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले.

Web Title: 9 arrested, including Gajanan Marane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.