राजगुरूनगर लोकन्यायालयात ९ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:48+5:302020-12-14T04:27:48+5:30
सोशल डिस्टन्स व शासनाच्या नियमांचे करीत लोक अदालत मध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेल्या ‘व्हॉट्सअँप व्हिडीओ कॉलिंग’ माध्यमातून १७ प्रकरणे तडजोडीतून ...
सोशल डिस्टन्स व शासनाच्या नियमांचे करीत लोक अदालत मध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेल्या ‘व्हॉट्सअँप व्हिडीओ कॉलिंग’ माध्यमातून १७ प्रकरणे तडजोडीतून निकाली निघाली. ८ महिन्यात वाढलेली दाखल प्रकरणांची संख्या विचारात घेता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार करोना विषाणू संसर्ग फेब्रुवारी २०२० नंतर प्रथमच येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात महालोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. विधी सेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या परवानगीने लोक न्यायालयात ठेवलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड करण्यासाठी प्रथमच ‘व्हॉट्सअँप व्हिडीओ कॉलिंग’चा वापर करण्यात आला. यामाध्यमातून १७ प्रकरणे मिटवण्यात यश आले. लोक अदालतची सुरुवात येथील जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या हस्ते झाली. यावेळी सह जिल्हा न्यायाधीश ए एम. अंबळकर, श्रीमती एस. एस. पाखले, आर. डी. पतंगे, डी. बी. पतंगे, खेड वकील बार असोशिएशनचे अध्यक्ष संजय पानमंद, उपाध्यक्ष प्रदीप गोरडे, प्रफुल्ल गाढवे, शीतल बडदे, शंकर कोंबल, योगेश मोहिते, अजय पडवळ, शुभांगी डुबे, बी. एम. सांडभोर, यांच्यासह वकील पक्षकार उपस्थित होते.