दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:15 AM2023-11-21T09:15:04+5:302023-11-21T09:16:00+5:30

पीएमपीमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी नवा विक्रम नोंदवत आहे....

9 crore to PMP in 7 days of Diwali; A fine of one and a half lakhs was recovered from freedmen | दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड

दिवाळीच्या ७ दिवसांत PMP ला ९ कोटींचा गल्ला; फुकट्यांकडून वसूल केला दीड लाखाचा दंड

पुणे : आनंद, चैतन्य आणि उत्साह घेऊन येणारी दिवाळी यंदा ‘पीएमपी’लाही लाभदायी ठरली आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या या ७ दिवसांत दररोज सरासरी १ कोटी २९ लाख ४८ हजार ४८० रुपये याप्रमाणे एकूण ९ कोटी ६ लाख ३९ हजार ३५९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ही कमाई दि. ९ ते १५ नोव्हेंबर दरम्यानची आहे.

दरम्यान, पीएमपीमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दरवर्षी नवा विक्रम नोंदवत आहे. ‘पीएमपी’ने दिवाळीत अशा फुकट्या प्रवाशांकडून दिवाळीच्या सात दिवसांत तब्बल १ लाख ४६ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत पीएमपीकडे यंदा ४२ टक्के अधिक महसूल जमा झाला आहे. २०२२ मध्ये महामंडळाला ६ कोटी ३५ लाख ८१ हजार ६९३ रुपये महसूल मिळाला होता. तसेच २०२१ मध्ये ५ कोटी ३४ लाख २४ हजार ६९१ कोटींचा महसूल मिळाला होता.

सात दिवसांत मिळालेला महसूल?

९ नोव्हेंबर - १,५६,११,९३५

१० नोव्हेंबर - १,३१,९९,६२९

११ नोव्हेंबर - १,२६,७५,९६५

१२ नोव्हेंबर - ९१,४०,५०७

१३- नोव्हेंबर - १,३१,५०,८४५

१४ नोव्हेंबर - १,२८,९१,५२४

१५ नोव्हेंबर - १,३९,६८,९४५

Web Title: 9 crore to PMP in 7 days of Diwali; A fine of one and a half lakhs was recovered from freedmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.