Mumbai Indians vs Chennai Super Kings सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या ९ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 01:08 PM2023-04-09T13:08:37+5:302023-04-09T13:16:32+5:30
18 मोबाईल हँडसेट, ३ लॅपटॉप, १ मॉनिटर, १ सीपीयू, १ राऊटर व रोख ९२ हजार रुपये असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे/किरण शिंदे: पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कोंढवा परिसरात कारवाई करत आयपीएल मधील क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या नऊ जणांना अटक केली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात होता.
यश प्रताप मनोज कुमार सिंह (वय 22 वर्षे), धर्मेंद्र संगम लाल यादव (वय 25 वर्ष), रिगल चंद्रशेखर पटेल (वय 22 वर्ष), अनुराग फुलचंद यादव (वय 25), इंद्रजीत गोपाल मुजुमदार (वय 30 वर्ष), सतीश संतोष यादव (वय 19 वर्ष), अजिंक्य शामराव कोळेकर (वय 30 वर्ष), हेमंत रवींद्र गांधी (38),
सचिन सतीश घोडके (वय 45 वर्षे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शाखेच्या पोलिसांना कोंढवा परिसरात आयपीएल मधील क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार युनिट तीनच्या पथकाने कोंढवा परिसरातील ब्रह्मा अंगण सोसायटीतील फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी त्यांना चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स या क्रिकेट मॅचवर आरोपी सट्टा घेताना व पुढे लावताना मिळून आले.
यावेळी आरोपी लोटस 365 या ऑनलाइन ॲपवर ग्राहकांना जुगार खेळण्यासाठी आयडी तयार करून देऊन त्या बदल्यात पैसे ऑनलाईन घेताना मिळून आले. त्यांच्याकडून 18 मोबाईल हँडसेट, तीन लॅपटॉप, एक मॉनिटर, एक सीपीयू, एक राऊटर व रोख 92 हजार रुपये असा एकूण 512000/- रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३७१/२०२३ महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.