ललित पाटील पलायन प्रकरणी ९ पोलीस निलंबित, ड्रग्स प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 19:16 IST2023-10-03T19:15:23+5:302023-10-03T19:16:01+5:30
ललित पाटील हा ड्रग्स तस्करी केल्याप्रकरणी कुख्यात आरोपी होता...

ललित पाटील पलायन प्रकरणी ९ पोलीस निलंबित, ड्रग्स प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे कारवाई
- किरण शिंदे
पुणे : पुण्यातील ससून ड्रग्ज प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस निलंबित करण्यात आले आहेत. या ड्रग्स प्रकरणात एक अधिकाऱ्यासह तब्बल ९ जणांचे तडकाफडकी निलंबन केले गेले आहे. ललित पाटील ड्रग्स विक्रीत ४ कर्मचारी तर ललित पाटीलची ससूनमधून पलायन प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह ५ जणांचे निलंबन झाले.
ललित पाटील हा ड्रग्स तस्करी केल्याप्रकरणी कुख्यात आरोपी होता. काल संध्याकाळी ६ वाजता ललित हा ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला होता. याप्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही कारवाई केली. कर्तव्यात कसूर करून कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे हे निलंबन करण्यात आले आहे.
निलंबित केलेले अधिकारी आणि कर्मचारी :
ASI जनार्दन काळे
PC विशाल ठोपले
स्वप्नील शिंदे
दिगंबर चंदनशिव
PSI मोहिनी डोंगरे,
हवालदार आदेश शिवणकर
नाईक, नाथाराम काळे
शिपाई पिरप्पा बनसोडे
शिपाई आमित जाधव